सोमवार, ४ जानेवारी, २०१६

Homemakers tips



-पराठ्याचे पीठ दह्यात भिजवावे ,थोडे सैल असावे ,सैल पीठ लाटण्यास सोपे जावे यासाठी एक तासभर फ्रिज मध्ये ठेवावे . लाटणे सोपे जाते आणि पराठे पण मऊ राहतात . 
२-पुऱ्यांची कणीक चवीपुरते मीठ ,एखाद चमचा साखर व मोहन घालून घट्ट भिजवावी . पुऱ्या खुटखुटीत आणि फुगीर राहतात . 
३-खाऱ्या शंकरपाळ्याच्या पिठात चमचाभर साखर आणि गोड्यामध्ये चिमुटभर मीठ घालावे . 
४-कोथिम्बिरीची जुडी निवडताना ,कोवळ्या काड्या टाकू नये ,त्यात मिरची ,आले ,लसूण ,मीठ घालून पेस्ट करून फ्रिजर मधे ठेवावी . थोडे लिंबू पिळल्यास पेस्ट हिरवीगार राहते . घाईच्या वेळेत हिरवा मसाला म्हणून उपयोगी पडते . जसे-रस्सा ,धिरडी ,थालीपीठ ,पराठे ,कोथिंबीरवडीत घालण्यासाठी ,दाण्याचा कूट घालून इन्स्टनट चटणी करता येते ,marination साठीही वापरू शकता . 
५-सीझन मधे कैरीचा कीस /लिंबाचा रस थोडे मीठ घालून ,फ्रिजर मधे ठेवावा ,हवा तेंव्हा थोडा काढून वापरता येतो . 
६-फावल्या वेळेत एखादा नारळ खरवडून ,फ्रीजर मधे ठेवावा ,हवा तेंव्हा थोडासा काढून स्वयंपाकासाठी वापरता येतो . 
७-कोथिंबीर हिरव्या मिरच्या ,पालेभाज्या निवडून एखाद्या पेपर मधे गुंडाळून मग प्लास्टिक पिशवीत घालून फ्रीज मधे ठेवल्यास जास्त दिवस टिकतात . 
८-दहीबुत्ती (फोडणी दिलेला दहीभात )मध्ये कांदा -काकडी बारिक चिरून घातल्यास गच्च होत नाही .



   १-लिंबाचे लोणचे मुरायला वेळ लागतो . लगेच हवे असल्यास लिंबाच्या फोडी करून बिया काढून टाकाव्यात . कुकर च्या डब्यात वर झाकण ठेऊन कुकरच्या वरण  भाता प्रमाणे तीन शिट्या काढाव्यात . रात्रभर फोडी बंद कुकर मधेच ठेवाव्यात . फोडी मऊ झालेल्या असतात ,झाल्या नसल्यास फोडी वरखाली करून पुन्हा एखादी शिट्टी काढावी . आता गार फोडींचा उपयोग ,उपासाचे गोड लोणचे ,तिखट लोणचे ,लिम्बूमिरची ,लेमन सॉस अश्या कोणत्याही लोणच्या साठी ,त्यात्या प्रकारचा मसाला वापरून करता येतो . 
२-कैरीचा छुंदा पण उन्हाच्या ऐवजी मायक्रोवेव मधे आटवला तरी पटकन होतो .
३-बेकिंग -कुकिंगला एसेन्स वापरताना कोणत्याही फ्लेवर बरोबर काही थेंब वनिलाचे घातल्यास चांगला उपयोग होतो . 
४-पुलाव साठी आपण खडा गरम मसाला वापरतो (आक्खा )त्याबरोबर यासर्व मसाल्याची थोडी पूड साईच्या दह्यात घालून किंचित मीठ -साखर घालून फेटावी आणि शेवटी पुलाव मधे मिक्स करून एक वाफ आणावी . स्वाद व रंग चांगला येतो . 
५-शिळा भात उरल्यास नेहमी फोडणीचा भात केला जातो ,त्या ऐवजी आवडीप्रमाणे ,पुलाव ,चायनीज फ्राईड राईस ,साबुदाणा खिचडी प्रमाणे खिचडी ,किंवा साखरभात नारळीभात पण करता येतो . फक्त गोडभात करताना शिजलेल्या भाताच्या निम्मी साखर /गूळ घालावे . एरवी आपण तांदूळाच्या बरोबरीने साखर घेतो . 

Homemakers tips


t . -१-सत्यनारायण च्या प्रसादाचा शिरा करताना रवा गुलाबीसर भाजून झाला की ,केळ्याचे तुकडे घालून पुन्हा थोडा भाजावा . रवा फुलून येतो ,केळे काळे पडत नाही ,स्वाद ही चांगला येतो . 

२-नारळ घालून रव्याचे लाडू करताना ,रवा भाजत आल्यावर त्यात खोवलेला नारळ घालून पुन्हा थोडा परतावा . रवा फुलून येतो ,खवट वास येण्याची भिती नसते . 

३पनीर ची भाजी करतानलादी च्या लादी शालों फ्राय करून मग तुकडे करून भाजी करावी ,खमंग लागते . 

४-चकल्या करताना मदतीला कोणी नसल्यास ,कढई भरुन एकचकली करावी ,उलटायला निथळायला सोपे जाते . तुकडे करून ठेवल्यास मुलांना डब्यात द्यायला पण बरे पडते . 

५-तळणी करताना ओहोटी च्या वेळेस तेल जास्त लागते ,धूर पण जास्त होतो . भरतीला तेल कमी जळते . तळणीच्या तिथीचा पाऊण भाग म्हणजे द्वादशीचा (१२)पाऊण ९होतो ,सकाळी /संध्याकाळी ८ते ९तळणी केल्यास तेल कमी लागते .

    १-गूळ घालून करतो त्या पक्वान्नात,चिमुट भर हळद व मिठाची कणी घालावी . रंग आणि स्वाद चांगला येतो . उदा-खांडवी,नारळीभात . 
२-साखरभाता साठी भात शिजवताना ,चिमुटभर हळद आणि मिठाची कणी घालावी . 
३-गूळपोळीत बेसन घालतो ते भाजण्यासाठी तेल वापरावे ,म्हणजे गूळ मऊ रहातो आणि चांगला पसरतो . 
४-बटाटेवडे /भजी करताना डाळीच्या पिठात थोडे वरण आणि अर्धा चमचा साखर घालावी ,कमी तेल पितात आणि कुरकुरीत होतात . 
५-उकडीच्या मोदकाचे सारण करताना त्यात १-२चमचे तांदूळपिठी घातल्यास चांगले आळून येते . 
६-तळणी करताना तेल फसफसायला लागले तर त्यात एखादे चिंचेचे बुटुक घालावे . 
७-धिरडी -डोसे तव्याला चिकटत असल्यास ,त्यात थोडा रवा घालावा,उलटणे सोपे जाते . 
८-डोश्याच्या पिठात अर्धा चमचा साखर ,अर्धा चमचा मेथीपूड ,चमचाभर बेसन घातल्यास डोसे जाळीदार ,सोनेरी ,कुरकुरीत होतात . 
९-मिसळणाच्या डब्यात मेथीदाणा पूड ठेवावी ,आंबट -गोड -तिखट -अश्या आमटी -भाजीला चांगला स्वाद येतो अन आरोग्यास ही चांगले . 
१०-

||टॉमी आणि जेमी ||



                   ।।टॉमी आणि जेमी ।।
टॉमी आणि जेमी ,पक्के दोस्त तुम्ही आणि आम्ही ,
उशिरा येता नेहमी नेहमी ,परत जायचीही घाई करता तुम्ही ,
माझी खोली आहे रिकामी ,खेळ खेळुया झकास नामी ,
बाबा चालला त्याच्या कामी ,मस्त खाऊ देईल माझी मम्मी .

।। बोबडी बडबड -बाळोबा ।।



                ।बोबडी बडबड -बाळोबा ।
बोलावे लागते बाळोबांशी ,झोप येते मग कशीबशी ,
डोक्याखाली छोटी उशी ,सारखे झोपतात डाव्याकुशी ,
वाघोबाची मावशी ,जिभेने चाटते हळूच मिशी ,
डोळे मिटून दूध पिशी ,नक्कल करतात तिची खाशी ,
डायपर मध्ये करतात शिशी ,गप्पा मारतात कोणाशी ?
फटाफटा शिंका देशी ,चपट्या नाकात जणू शिरली माशी ,
आसने तुम्हाला जमतात कशी ?सायकल चालवी एक मैल ताशी ,
आंघोळ तुमची कावळ्या सरशी ,झोप तुमची लहरी कशी ?
चिंता नसे सुखी जिवाशी ,आहेतरी तुमची कोणती राशी ?
घरदार सारे तुमच्या सेवेशी ,घरदार सारे ---------

||बोबडी बडबड -बदकुल्या ||



               ||बोबडी बडबड -बदकुल्या ||
बदकुल्यारे बदकुल्या , पाय तुझे फदकुल्या ,
अंग तुझे तेलकट ,पाणी  जाते ओघळत ,
पोहण्यात तुझ्या किती नजाकत,
नजरेतून तुझ्या ,मासा काही नाही चुकत ,
चमच्या सारखी चोच खास ,
सांडत नाही खाली घास .

||बोबडी बडबड -मधले खाणे ||



         बोबडी बडबड -मधले खाणे ।।
वाटाणा फुटाणा शेंगदाणा ,उडत येतो टना टणा ,
काजू बदाम बेदाणा ,तोंडात भरला बोकाणा ,
उपमा पोहे गरम शिरा ,वड्यात वडा साबुदाणा ,
लाडू -चिवडा कायम तयार ,भूक लागली पटकन आणा ,
द्राक्ष संत्री अंबा केळी ,फळे म्हणजे जीवनसत्वांचा खजाना ,
करंजी चकली चा तळला घाणा,ताई बाईच्या दिवाळसणा ,
चव बघायची कुणाकुणा ,एकेकाने हात पुढे आणा .

।। लग्न एक जुगार ।।



       संभ्रम लग्न जमवताना 
आपल्या मुलांचे लग्न जुळवताना ,पालकांना प्रश्न पडतो बक्कळ ,
पत्रिका ,गुण बघावेत कि नाही ,चालत नाही अक्कल ,,
कधि वाटते अज्ञानात असते सुख ,दिसत नाही मोठे मुसळ ,
जाणकारांना टोचत राहते ,दूर वरचे छोटे कुसळ ,
निम हकीम जान खतरे मैं ;नुसते कॅन्फ्यूजन त्याची होते बिन चवीची मिसळ ,
जोड्या जुळून येतात वरून ,पण चुकत नाही जुळवा जुळव अन धावपळ ,
लग्न एक जुगार ,तरी जिंकण्या साठी अड्जेस्टमेंट ची हुकमी पत्ती हवीच जवळ .