सोमवार, ४ जानेवारी, २०१६

Homemakers tips



-पराठ्याचे पीठ दह्यात भिजवावे ,थोडे सैल असावे ,सैल पीठ लाटण्यास सोपे जावे यासाठी एक तासभर फ्रिज मध्ये ठेवावे . लाटणे सोपे जाते आणि पराठे पण मऊ राहतात . 
२-पुऱ्यांची कणीक चवीपुरते मीठ ,एखाद चमचा साखर व मोहन घालून घट्ट भिजवावी . पुऱ्या खुटखुटीत आणि फुगीर राहतात . 
३-खाऱ्या शंकरपाळ्याच्या पिठात चमचाभर साखर आणि गोड्यामध्ये चिमुटभर मीठ घालावे . 
४-कोथिम्बिरीची जुडी निवडताना ,कोवळ्या काड्या टाकू नये ,त्यात मिरची ,आले ,लसूण ,मीठ घालून पेस्ट करून फ्रिजर मधे ठेवावी . थोडे लिंबू पिळल्यास पेस्ट हिरवीगार राहते . घाईच्या वेळेत हिरवा मसाला म्हणून उपयोगी पडते . जसे-रस्सा ,धिरडी ,थालीपीठ ,पराठे ,कोथिंबीरवडीत घालण्यासाठी ,दाण्याचा कूट घालून इन्स्टनट चटणी करता येते ,marination साठीही वापरू शकता . 
५-सीझन मधे कैरीचा कीस /लिंबाचा रस थोडे मीठ घालून ,फ्रिजर मधे ठेवावा ,हवा तेंव्हा थोडा काढून वापरता येतो . 
६-फावल्या वेळेत एखादा नारळ खरवडून ,फ्रीजर मधे ठेवावा ,हवा तेंव्हा थोडासा काढून स्वयंपाकासाठी वापरता येतो . 
७-कोथिंबीर हिरव्या मिरच्या ,पालेभाज्या निवडून एखाद्या पेपर मधे गुंडाळून मग प्लास्टिक पिशवीत घालून फ्रीज मधे ठेवल्यास जास्त दिवस टिकतात . 
८-दहीबुत्ती (फोडणी दिलेला दहीभात )मध्ये कांदा -काकडी बारिक चिरून घातल्यास गच्च होत नाही .



   १-लिंबाचे लोणचे मुरायला वेळ लागतो . लगेच हवे असल्यास लिंबाच्या फोडी करून बिया काढून टाकाव्यात . कुकर च्या डब्यात वर झाकण ठेऊन कुकरच्या वरण  भाता प्रमाणे तीन शिट्या काढाव्यात . रात्रभर फोडी बंद कुकर मधेच ठेवाव्यात . फोडी मऊ झालेल्या असतात ,झाल्या नसल्यास फोडी वरखाली करून पुन्हा एखादी शिट्टी काढावी . आता गार फोडींचा उपयोग ,उपासाचे गोड लोणचे ,तिखट लोणचे ,लिम्बूमिरची ,लेमन सॉस अश्या कोणत्याही लोणच्या साठी ,त्यात्या प्रकारचा मसाला वापरून करता येतो . 
२-कैरीचा छुंदा पण उन्हाच्या ऐवजी मायक्रोवेव मधे आटवला तरी पटकन होतो .
३-बेकिंग -कुकिंगला एसेन्स वापरताना कोणत्याही फ्लेवर बरोबर काही थेंब वनिलाचे घातल्यास चांगला उपयोग होतो . 
४-पुलाव साठी आपण खडा गरम मसाला वापरतो (आक्खा )त्याबरोबर यासर्व मसाल्याची थोडी पूड साईच्या दह्यात घालून किंचित मीठ -साखर घालून फेटावी आणि शेवटी पुलाव मधे मिक्स करून एक वाफ आणावी . स्वाद व रंग चांगला येतो . 
५-शिळा भात उरल्यास नेहमी फोडणीचा भात केला जातो ,त्या ऐवजी आवडीप्रमाणे ,पुलाव ,चायनीज फ्राईड राईस ,साबुदाणा खिचडी प्रमाणे खिचडी ,किंवा साखरभात नारळीभात पण करता येतो . फक्त गोडभात करताना शिजलेल्या भाताच्या निम्मी साखर /गूळ घालावे . एरवी आपण तांदूळाच्या बरोबरीने साखर घेतो . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा