सोमवार, २४ ऑक्टोबर, २०१६

बो .ब . -डोन्ट शाय

             बो .ब . -डोन्ट शाय 
डोन्ट शाय ,डोन्ट शाय ,यू आर अ बोल्ड बॉय ,
डोन्ट क्राय ,डोन्ट क्राय ,यू आर अ ब्रेव्ह बॉय ,
बी हॅपी ,डोन्ट बी सॅड ,यू आर अ गुड बॉय ,
एन्जॉय अँड गिव मी हाय फाय ..... बाय बाय ,
नाऊ यू आर मॉम अँड डॅडीज बॉय ,एन्जॉय -एन्जॉय . 

जो जो रे जो जो (पारंपरिक )

            जो जो रे जो जो (पारंपरिक )
जोजो रे जोजो तान्हुल्या बाळा ,तुझी आई गेली शिंपी आळीला 
शिंपी हो दादा ,शिंपी हो ताई ,बाळाचे झबले झाले का नाही ?
आत्ता हो देतो मग हो देतो ,शिंपी दादाने उशीर केला ,
इकडे बाळाने धिंगाणा केला . 
(असे सर्व बलुतेदारांची नावे घेई पर्यंत बाळ झोपी जाते ,या गीता मध्ये सुंदर आवाज 
अन संगीत ज्ञानाची गरज नाही कारण गद्यात्मक पद्य आहे .)
सुतार दादा -पाळणा झाला कि नाही ,
सोनार दादा -साखळी झाली कि नाही ,
शाळेत -दादाला आणायला ,
ऑफिस वाले दादा -आई चे ऑफिस सुटले का नाही 
अमेरिकेत -वॉलमार्ट आळीला -ग्रोसरी करायला ,
बेबीसरस -कपडे ,डायपर ,खेळणी इ . आणायला ,
इंडियन स्टोर ला -खाऊ ,डाळ ,तांदूळ आणायला असे आपण ऍड करू शकतो .

देवा दे परमोच्च प्रेम

                     परमोच्च प्रेम 
भरभरून दिलेस भौतिक सुख इहलोकी ,
थोडे मिळाले कि अधिकाची आशा न चुकी ,
तूच घातलेस जन्माला ,म्हणे कर्माची फळे भोगायला ,जी राहिली बाकी ,
निरिच्छ -निष्काम प्रेम कळते पण वळत नाही ,ते असूदे पुस्तकी ,
पवित्र असले तरी अपूर्णच असते ,प्रेम एकाकी ,
आता मिळूदे प्रतिसादी परमोच्च प्रेम परलोकी ,
खरच देते वचन ,मग मागायचे राहणार नाही काही बाकी . 

शुक्रवार, २१ ऑक्टोबर, २०१६

बाळाचे आगमन -बोबडी बडबड

        बाळाचे आगमन -बोबडी बडबड 
कधी भासे सावळा -शामल ,जणू उमलले नीलकमल ,
भासे कधी गोरे गोरे तुझे तन ,केतकीचे सुंदर बन ,
कुरळे काळे केस गुंफले ,जणू नभी ढग दाटले ,
निळे डोळे जणू सागर ,भुवया जणू कमान चढविली क्षितिजावर 
गोल गुबऱ्या गालावर ,खळी जणू चंद्र -विवर ,
इवले इवले तुझे कर ,स्पर्श होता फुटे पाझर ,
सोनियाच्या पावलांनी झाले तुझे आगमन ,
घर -दार फुलून गेले ,जणू काही नंदनवन ,
गालातील गोड हसू आणि तुझी जांभई ,
सुख आता ठेवू कुठे ,विचार करिती नंद आणि यशोदा माई .

. कहाणी सुफळ संपूर्ण

.             कहाणी सुफळ संपूर्ण 
कहाणी सुख दुःखाची ,कहाणी मैत्री शत्रुत्वाची ,
कहाणी गरिबी श्रीमंतीची ,कहाणी लाडकी दोडकीची ,
कहाणी सुष्ट दुष्टाची ,कहाणी आस्तिक नास्तिकाची ,
कहाणी जय पराजयाची ,कहाणी जीवन मरणाची ,
कहाणी सूडद्वेषाची अन प्रेमाची ,कहाणी अभाव प्रभावाची ,
जितके प्रश्न ,अपेक्षा तिततक्याच उत्तरांची ,
असावी श्रद्धा- भक्ती कामावर अन देवावर ,सोबत उभारी मनाची ,
साठा उत्तरांची होवो पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण कहाणी आयुष्याची . 

गुरुवार, २० ऑक्टोबर, २०१६

. सिंगल पेरेंटिंग

.           सिंगल पेरेंटिंग 
शादीका लड्डू एखाद्याला पचतो ,एखाद्याला बाधतो ,पण भिस्त असावी साकारात्मकतेवर ,
एका चाकावर गाडी चालवण्याची वेळ आली तरी ,प्रयत्नांती भेटतोच परमेश्वर ,
स्वयंपाक पाणी आले गेले ,मुले वाढवणे ,एकल्याने सांभाळायचे घर ,
पैसे काही झाडाला लागत नाहीत ,त्यासाठी जावे लागतेच कामावर ,
कसरत असते तारे वरची ,ताण असतो तनामनावर ,
मुखवटे चढवून जगावे लागते ,दानव आहेतच जगभर ,
कुणीतरी मिसमॅच भेटले तरी ,शेवटी जग चालते आहे विश्वासावर -
माणसा -माणसाच्या चांगुलपणावर . 

. नको अतिरेक

.             नको अतिरेक 
ओला असो वा कोरडा ,दुष्काळ म्हणजे पाण्यासाठी वणवण फिरणे ,
नसे चांगला भावनांचा महापूर ,वा डोळ्यांचे पाणी आटणे ,
कधी पोटाची खळगी भरायला ,नसतात मूठभर फुटाणे ,
अति साठवे पर्यंत दातच नसतात खायला चणे ,
उत्तम असते चांगल्या साठी प्रयत्न करणे अन असेल त्यात समाधान मानणे .