फेब्रुवारी महिना आला की व्हॅलेंटाईन डे चे वारे वाहू लागतात . प्रेमाच्या अनेक रंगछटा आपल्याला पहायला मिळतात . गडद -फिक्या ,प्रकट -सुप्त ,एकांगी -द्विअंगी ,त्रिकोनी ,स्वार्थी -निस्वार्थी ,सफल -असफल इत्यादि . सामान्यांपेक्षा प्रेमात दुःखांताला सामोरी जाणारी अनेक प्रेमी -युगले ,अजरामर झालेली आपल्याला माहित आहेत . त्यातीलच एक म्हणजे शमा -परवाना ही जोडी . प्रेयसीचे प्रेम मिळवण्याच्या प्रयत्नात स्वतःला संपवून अमर झालेला परवाना चांगलाच भाव खाऊन जातो . सोशिक -कर्तव्यनिष्ठ वृत्ती मुळे ,शमा जरा दुर्लक्षित -उपेक्षितच राहिलीशी वाटते . मला अश्यांबद्दल विशेष आस्था आहे ,कदाचित म्हणून शमाने एकदा आपली व्यथा ,माझ्या जवळ व्यक्त केली आणि तीच मी आपल्या समोर पेश करीत आहे .
मराठी माझी मातृभाषा ,हिंदी मैत्रभाषा -राष्ट्रभाषा आणि अध्ययनाचे माध्यम ,त्यामुळे कधी मराठीतून विचारांशी संवाद होतो तर कधी हिंदीतून . सहज सुसंवाद महत्वाचा !!!!
व्हॅलेंटाईनडे ला शमा -परवाना या युगलाला निवांत हवा असल्याने ,ते उद्याच आपल्या भेटीला येत आहेत .
आसावरी जोशी
बुधवार, ३१ जानेवारी, २०१८
शुक्रवार, ८ डिसेंबर, २०१७
शतकपूर्ती एकच्या नोटेची
शतकपूर्ती एकच्या नोटेची
२०१७च्या नोव्हेंबर तीस ला ,एक रूपयाच्या नोटेने ओलांडली वयाची शंभरी ,
त्याच्या लहानपणी ,दूध -किराणा -भाजी ,असे खर्च भागवी 'तो 'दरमहाचे कितीतरी ,
चाऊ -म्याऊ -खाऊ देई ,सिनेमा -जत्रा -मौज -मज्जा ,लाड पुरवी उदार अंतरी ,
असो राखी -बीज ,वाढदिवस ,मुंज ,लग्न ,सण -समारंभ ,तोरा मिरवी एक नंबरी ,
दोन अधेल्या ,चार पावल्या ,सोळा आणे ,शंभर पैसे, नावे सुंदर सगळी अर्थभरी ,
कमवायलाही तितुकेच कष्ट ,मूर्ति लहान कीर्ति महान ,कहाणी त्याची सफळ संपूर्ण साठाउत्तरी .

सोमवार, ४ डिसेंबर, २०१७
'एक 'नंबर आठवणी
'एक 'नंबर आठवणी
शंभर पैसे किंमत असलेल्या एक रुपयाने शंभरी गाठली ,तरी त्याला आजही मानाचे स्थान आहे . १९६०च्या आसपासचा काळ ,आम्ही राजस्थान /मध्यप्रदेश च्या सीमारेषे वरील भवानीमंडी -भैसोदामंडी या जुळ्या खेड्यात रहात होतो .
घरून मिळालेल्या एक रुपयात ,गावच्या मेळ्यामध्ये आम्ही मैत्रिणींनी मिळून खूप मज्जा केलेली आहे . बोरे ,ओले शिंगाडे ,लिमलेट आणि एक्सट्रास्ट्रॉंग च्या गोळ्या दहा -दहा पैश्यात मिळत ,तसेच जत्रा म्हंटलेकी रहाटपाळणा ,चक्र यात बसणे ,मौत का कुआ नामक भारी प्रकार बघणे ,आनंदप्रद असे . पैसे उरले तर बांगड्या ,रिबन घेतली जाई .
मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही भावंडे आणि आमचे मित्र -मैत्रिणी स्वखुशीने शेंगा सोलायचे काम करीत असू . वडिलांचा शेती -बागायतीचा व्यवसाय असल्याने ,त्यांना शेंगांच्या पेरणी साठी बियाणे म्हणून हाती सोललेले दाणे लागत . वडील आम्हाला एक किलो दाणे सोलले की दहा पैसे मोबदला देत ,शिवाय दाणे खायला बंधन नव्हते . दोन -तीन दिवसात एक रुपया जमत असे प्रत्येका कडे . त्यातून बर्फाचा रंगी -बेरंगी -गोड गोळा ,कुल्फी ,गाभुळलेली चिंच इ . विकत घेऊन खात असू . चाळीस पैश्याचे मागचे तिकीट काढून एखादा सामाजिक /धार्मिक सिनेमा बघण्याची चैन पण त्यात भागत असे . सर्वांचे उरलेले पैसे एकत्र करून एखाद रुपयाची छोटी गोष्टीची पुस्तके विकत आणून रोटेशन मधे पुस्तके वाचण्याचा आनंद ही काही औरच होता .
आसावरी जोशी ,कर्वेनगर पुणे ४११०५२
मोबाईल नंबर -९६८९३९०८०२

शुक्रवार, १ डिसेंबर, २०१७
क्षण कसोटीचे -श्रद्धा होतीच ती अजून दृढ झाली .

दत्तजयंती च्या निमित्ताने एक जुनी आठवण ताजी झाली . साधारण नऊ -दहा वर्षा पूर्वीचा प्रसंग आहे ,मी आमच्या शेजारच्या देवगांवकर कुटुंबियांसोबत गुजरात -सौराष्ट्र च्या ट्रिपला गेले होते . आम्ही आठ लोक होतो . अहमदाबाद ,डाकोर ,द्वारका ,सोमनाथ ,राजकोट ,पोरबंदर ,जूनागढ गिरनार अश्या बऱ्याच ठिकाणी आम्ही फिरलो . गिरनारला "श्री गुरुदत्त शिखर "चढायचे असेल तर दहा हजार पायऱ्या चढाव्या लागतात . गुरुदेवदत्त आमच्या सर्वांचे श्रद्धास्थान असल्याने एक दिवस आम्ही गिरनार दर्शना साठी राखून ठेवला होता . रात्री हॉटेल मध्ये मुक्काम करून सकाळी लवकर गिरनार वर जायचे ठरले . काही लोक डोलीने गेले ,एकांनी हॉटेलवर थांबणे पसंत केले . आम्ही तीन लोकांनी पायऱ्या चढून जायचे ठरवले . काहीना काही कारणाने आम्हाला चढणे सुरु करायला थोडा उशीरच झाला . सकाळी दहा च्या आसपास आम्ही चढायला सुरुवात केली . चालणाऱ्यांची आणि डोली वाल्यांची बऱ्यापैकी वर्दळ होती . शिखरावर जाताना वाटेत अनेक देवळांचे दर्शन घेत गेलो . उदा . जैन मंदिर ,अंबामाता ,मच्छिन्द्रनाथ ,गोरखनाथ इत्यादी . सर्वोच्च शिखरावर "श्री गुरु दत्तात्रेयांचे "जागृत देवस्थान आहे . शिखरावर दत्ताचा पादुका आणि मूर्तीची मनोभावे पूजा केली शांतपणे दर्शन घेतले . दहा हजार पायऱ्या चढून गेल्याचा थकवा जणु पळून गेला . जागृत देवस्थान म्हणजे काय याचा खरा अर्थ कळला . परतीचा प्रवास सुरु करणार तर समजले कि थोडेसे उतरून पुन्हा थोडे चढले की तेथे अखंड धुनी आणि प्रसादाचे जेवण मिळते . धुनीचे दर्शन आणि प्रसादा शिवाय परतणे मनाला पटले नाही . आम्ही तेथेही गेलो . मन तृप्त झाले . आता परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली
गिरनार च्या शिखरावर पाषाणात दत्ताचे दर्शन झाले आणि पायथ्याशी आल्यावर त्या तरुण मुला -मुलींच्या रूपानेच जणू देव भेटल्याची प्रचिती आली .
Asawari Joshi
1 Chintamani, Karvenagar, Pune 411052
Cellphone: 9689390802
Sent from my iPad
Sent from my iPad
मंगळवार, २८ नोव्हेंबर, २०१७
साठी -एक महत्वाचा टप्पा
साठी -एक महत्वाचा टप्पा
काय कमवले ,काय गमवले ,काय राहिले !चा टप्पा असतो 'साठी ',
नैसर्गिक विस्मरणाला नको देऊ या नांव -"साठी बुद्धी नाठी "
चूक -भूल देऊ -घेऊ ,नाजुक नाती जपण्या साठी ,
विस्मरणाचा घेऊ लाभ ,मागू क्षमा -करु क्षमा ,अलगद उकलू गुंतागुंती ,
उगवती अन मावळती मधले क्षण हे जीवन ,साक्षीला असते ,माता आणिक माती ,
एक हात देऊया पुढील पिढीच्या हाती ,अन दुसरा मागील पिढीच्या हाती ,
चढ असो वा असो उतार ,देते आधार निस्वार्थी काठी ,
देऊ आनंद ,घेऊ आनंद ,आनंदाची चावी जपून ठेवूया आप कनवठी ,
उरले -सुरले गुंतवू परमार्थी ,संचित वाढे परलोका साठी ,
छिद्र -पोकळी विसरुनि सारे ,सूर मुक्तीचा ,वेणुस गवसे ,श्रीहरीच्या अधरी -ओठी .

मंगळवार, १९ सप्टेंबर, २०१७
आजोळ -------भाग ३
आजोळ -------भाग ३
अजून एक गोष्ट आवर्जून सांगाविशी वाटते ,ती म्हणजे मामा मंडळी कडून आईला भाऊबीज म्हणून' ,स्त्री मासिक आणि केसरी वर्तमानपत्राची वार्षिक वर्गणी प्रेमाची भेट असायची . त्यामुळे दूरवर अमराठी प्रांतात राहून सुद्धा ,आमची मातृभाषा मराठीशी ,नाळ जुळून राहिली .
त्याच प्रमाणे एक विस्मयकारक गोष्ट म्हणजे ,आजही माझ्या सुंदर स्वप्नात ,जेंव्हा एखादे घर येते ,तेंव्हा त्याचे चित्र आजोळच्या घराशी मिळते जुळते असते . याची उकल अशी असू शकेल कि हे माझे जन्मस्थान आहे आणि त्याच बरोबर येथे मी क्वालिटी टाईम स्पेंड केला आहे .
असे म्हणतात ,आज बदलापुर खूप बदलले आहे ,पण देवधर वाडीतील भावंडे ,त्याच बरोबर त्यांचे बेटर हाफ ,आणि पुढील जनरेशन ,यांचा आधार पूर्वी सारखाच आश्वासक आहे .
अजोळीच्या वटवृक्षाचा अनेक शाखा ,उपशाखा ,पारंब्या ,उपपारंब्या युक्त पसारा आहे . उंची आणि विस्तारा बरोबर पाळेमूळे ही खोलवर रुजल्याने ,याच्या सावलीत मने खरोखरच विसावतात .
आसावरी जोशी /शकू

सोमवार, १८ सप्टेंबर, २०१७
आजोळच्या ----भाग २
आजोळच्या ----भाग २
बदलापुरला सर्व बहिणी आणि भाचरं जमली की श्रीधर मामा ,विसु मामा ,मन्या मामा यांना काय करू अन काय नाही असे व्हायचे . लाडा सोबत गप्पा -गोष्टी ,थट्टा मस्करीही असायची . शकुंतला मामी ,वसुधा मामी अन माधवी मामी ,हसतमुखाने एवढ्या सगळ्या लोकांचा स्वयंपाक कश्या करत याचे आश्चर्यच वाटते आता . तीन ही माम्या' सुग्रण ',म्हणजे रोज रोज केळ्याची 'शिक्रण 'वाल्या नाहीत हं !!त्यांच्या प्रत्येक पदार्थाला तृप्ती देणारी चव असायची . प्रेम आणि आपुलकी या सामुग्रीचा सढळ हाताने वापर करीत ,म्हणून असेल कदाचित .
आंबा ,जांभुळ ,तुती यांचा फलाहार ,माम्यांनी लोणच्या साठी चिरलेल्या कैरीच्या मीठ -हळद -तिखट लावून ठेवलेल्या फोडी ,अचानक कमी झालेल्या असायच्या .
तळघरात आंब्यांची लावलेली अढी ,तयार झाली की नाही ती सारखी चेक करणे ,कारण प्रत्येकाला रोज एक आक्खा आंबा खायला मिळत असे . शिवाय अधून -मधून जेवणात अंबरस असायचाच . कागदाच्या चौकोनावर मिळालेल्या फोडणी च्या भाकरीची चव ही आंब्याच्या तोडीसतोड .
बाकी खेळ म्हणाल तर डबा ऐसपैस ,पत्यातील नाटेठोंम ,ज्याचे खरे नाव उशीरा उमगले ,झब्बू बदामसात ,जांभळे गोळा करुन आणणे ,अंगणातील मोरी चा तरण तलाव बनवणे इ . नाना आणि मामा लोकांची हौस आणि कष्ट या मुळे बहरलेल्या ,परसबागे मुळे ,आम्हाला ,अनेक प्रकारची फुलझाडे आणि फळझाडे पाहायला मिळाली . पांढरी मिरची ,अक्कलकाढा ,लाजाळु ,याचेतर अप्रूपच वाटे .
रोज संध्याकाळी सर्व मुलांनी झोपाळ्यावर बसून' शुभं करोती ' म्हणणे ,कधीतरी गुलाबाची बाग ,नदी ,मारुति मंदिर येथे फिरायला जाणे व्हायचे .आम्ही मावस ,आत्ते ,मामे भावंडे असायचोच ,त्यात भर म्हणून वाड्यातील भाडेकरू कुटुंबीयांची मुले ही असायची .

याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)