सोमवार, ४ जानेवारी, २०१६

-||स्त्री ||-


                  -स्त्री -
शक्ती -समृद्धि -विद्येची देवी ,दुर्गा -लक्ष्मि -सरस्वती ,
वंशाची पणती ,सर्वस्व समर्पित प्रिती 
प्रजननाची शक्ती ,वात्सल्याची मूर्ती ,
नाही बलाचे प्रदर्शन ,म्हणून का अबला ती ?
सहनशीलतेची अपरिमिती ,
पुरुषाला पूर्णत्वास नेणारी प्रकृती ,
यज्ञाची पूर्णाहुति ,मंत्राची फलश्रुती ,
दिव्यालाही जीवन देणारी ती ज्योती ,
तिच्या प्रगतीत सकल विश्वाची उन्नती ,
नको पूजेचे अवडंबर ,नको देव्हाऱ्यातील मान ,
नकोच नको त्याच्या पायाखालची वहाण ,
परस्पर आदर -न्याय प्रेमाने पारडी असावीत समान ,
एकमेकांना पूरक नाकोणी मोठे नाकोणी लहान ,
एक नयन तर ,दुसरा कान ,एक जिव्हा तर दुसरा स्पर्श -ज्ञान ,
एक श्वास तर दुसरा उश्वासाचे भान ,तो-ती मिळूनच असतात जीवन देणारे पंचप्राण . 
                       

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा