बुधवार, २७ जुलै, २०१६

हवामानाचे वर्तमान



                                                                     हवामानाचे वर्तमान 
घामाच्या धारांनी पुणेकर हैराण झाले ,अमुक तमुक शहराला अवकाळी पावसाने झोडपले ,
जोरदार पावसाने रस्ते तुंबून ,जनजीवन विस्कळित झाले ,दरड कोसळून घाटात कोंडी ,लोक वैतागले ,
गारपिटीने लाखोंचे नुकसान ,हिम -वर्षावाने उत्तर भारत गोठले ,लोक गारठून गेले ,
ग्लोबल वॉर्मिंग तर परवलीचा शब्द झाला ,लहान -थोर सर्रास वापरू लागले ,
उन्हाच्या तडाख्याने हैराण झालेल्या लोकांची पसंती बसायला घरात ,
घरात ही पडेना चैन ,ए . सी . पंखा ,कूलर च्या कृत्रिम वाऱ्यात ,माणसाला हवे सगळे माफक प्रमाणात ,
उन्हाळ्यात म्हणायचे केव्हां एकदा पाऊस पडतो ,पावसाळ्यात म्हणायचे ,केव्हा एकदा सूर्य दिसतो ,
आपली थंडीच कशी बरी स्वेटर शालीने मस्त ऊब येते ,पण नकोबाई ,कामे संपण्या पूर्वीच दिवस संपतो ,
दुष्काळा मुळे शहरात झाली पाणी कपात ,हंडाभर पाण्यासाठी मैलो चालावे लागते खेड्यात ,
घामाच्या धारांवर पावसाच्या धारांनी केली मात ,रेनकोट -छत्र्या खरेदी साठी गर्दी उसळली बाजारात ,
एकच फोटो गाळलेली जागा भरतो पेपरात ,म्हणे उभा छापला तर आयफेल आडवा छापला तर हावडाब्रिज कलकत्त्यात ,
गांव -राज्य -देशपातळीवर हवामानाचे वेगवेगळे अंदाज ,निसर्गाचे अजूनच वेगळे रूप पाहून ,लोक अजूनच गोंधळतात ,
निसर्गाचा सिंहाचा वाटा आहे आपल्या आयुष्यात ,त्याचे रक्षण करण्या साठी सर्वांनी खारीचा वाटा तरी उचलुयात . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा