बुधवार, १७ ऑगस्ट, २०१६

अमेरिकेतील मुलांचे पालक

              अमेरिकेतील मुलांचे पालक 
मध्यंतरी मी अमेरिकेत नोकरीला जाणाऱ्या मुलांची मनस्थिती वाचण्याचा प्रयत्न केला होता . आता पालकांच्या नजरेतून थोडे चित्रण -----
मुले अमेरिकेत सेटल झाली की पालकांच्या सुरु होतात परदेश वाऱ्या ,
बालपणी आम्हाला स्वप्नातही वाटले नसेल की आयुष्यात या गोष्टी घडतील साऱ्या ,
अमेरिकन व्हिसा -पॅकिंग -प्रवास -येथील आवरा -आवरी ,टेन्शन असते जाम ,
परदेश आकर्षण अन मुला -नातवंडांचा मिळणारा सहवास ,यामुळे सोपेहोते अवघड काम ,
तेथील माणसे ,समृद्धि -स्वच्छता -स्वातंत्र्य -शिस्त सर्व जोपासतात गाळून घाम ,
विकेंड चे घेऊन टॉनिक ,पाच दिवसात ऑफिस ची कामे उरकतात तमाम ,
विकेंडला कल्चरल ,नॅचरल ,मॅनमेड स्थळांचे दर्शन अन बाजारहाटाची यादी लांब ,
कॅलिफॉर्निया ,वॉशिंग्टन ,न्यूयॉर्क दर्शन अन नायगराचा प्रवाह बेलगाम ,
लॉंग विकेंड ला जोडून सुट्टी घेऊन ,मुले प्रेमाने घडवतात अमेरिकेची यात्रा चारधाम ,
उरकायचे सारे कधी हॉटेल तर कधी मित्र आप्तांकडे ठोकून मुक्काम ,
कधी विमान प्रवास कधी रेंटलकार  सोबत भरपूर चालायला असावे तैयार ,
वाटते स्वर्गीय सुख अजून काय असते ?तेसोडून मुले का करतील इकडे यायचा विचार ?
विपरीत हवामानावर मात करुन सर्व केले कंडिशन्ड ,ऑफिस -घर -मॉल अन कार ,
पालकांचा वेळ चांगला जातो अन जमेल तेवढी मुलांना मदत ,जर घरात केली कामे चार ,
काही वर्षांनी मुले म्हणतात ,एकमेकांची काळजी करत बसण्यापेक्षा ,आई -बाबा इकडेच राहायचा करा ना विचार ?
जननी जन्मभूमि ,स्वभाषा ,स्वातंत्र्य सोडून पालकांना ,स्वर्गीय सुख पचविणे जड जाते फार ,
कधी -कधी प्रत्येक जण आपापल्या जागी बरोबर असतो  ,पण जुळत नाहीत विचार ,
जग म्हंटलेकी उत्तर -दक्षिण गोलार्द्ध असणारच ,पण दोन्ही मिळूनच पूर्णगोल होणार !!
यू . एस . मधील काही खटकलेल्या गोष्टी ---
दोन मुले किंवा दोन मुलींची निखळ मैत्री नेहमीच असतो का मनोविकार ?
महासत्ता असून मुला -मुलींना निळ्या -गुलाबी रंगात बांधायचा का करावा संकुचित विचार ?
अति स्वातंत्र्या मुळे आपल्या प्रत्येक कृतीला फक्त आपणच जवाबदार ,
निर्णय चुकला ,संकट आलेतर तर ,खूपच वाटते असहाय अन निराधार . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा