मंगळवार, ३० ऑगस्ट, २०१६

मत प्रदर्शनाचे प्रकार

     मत प्रदर्शनाचे प्रकार 
नेहमी माहितीये मला ,तेच म्हणायचे होते ,हा एक मतप्रदर्शनाचा प्रकार ,
संभाषण म्हणजे ,आधी नाही नाही नाही ,म्हणून टाकायचे त्रिवार ,
गुबुगुबू नंदीबैलाला ,आधीच शिकवून केलेले असते हुशार ,
काही नाईलाजाने डोलवतात मान ,कारण असतात परिस्थितीने बेजार ,
काहींच्या शब्दकोषात हो -नाही ,दोनच शब्द ,मान डोलवूनच त्याचा उच्चार ,
बोलणे सोडाच ,मनाचा थांगपत्ता लागत नाही ,काही असतात इतके निर्विकार ,
उचलली जीभ लावली टाळ्याला ,बोलणे किती सोपे !मग कशाला एवढा विचार ,
एक घाव दोन तुकडे ,कशाला हवी बडबड बेकार ,इसपार नाहीतर ऊसपार ,
काही वक्तृत्वात हुशार ,त्यांना हवे होलाहो करणारे श्रोते दोन चार ,
तोडणे -जोडणे दोन्ही साधता येते ,म्हणूनच बोलावे सदा करोनि सारासार विचार .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा