मंगळवार, ४ एप्रिल, २०१७

जय श्रीराम -रामनवमी

रामजन्माचा शुभदिनी अक्षरमालेतील एक पुष्प श्रीराम चरणी अर्पण करते . 
           जय श्रीराम -रामनवमी 
त्रिभुवनतारक ,तू सुखकारक ,रघुपती राघव ,राजाराम -सीतामाई ,
राजीव लोचन ,श्यामसुंदर ,चैत्र शुद्ध नवमीला धन्य जाहले तात दशरथ -कौसल्या आई ,
आला अयोध्येत आनंदाचा पूर ,असे झाले किती किती करावी उतराई !!!
जनक नंदिनी -भूमिकन्या -सीतापती रामचन्द्र ,एकपत्नी व्रताचा आदर्श देई ,
मर्यादा पुरुषोत्तम राम -जानकीच्या स्मरणाने जन्मोजन्मीचे पातक जाई ,
सिया -रामाने किती सोसले !ते ही आनंदाने ,धर्म -रक्षण करण्या पाई ,
असशी रामदास हनुमानाच्या रोमा रोमात ,चराचराच्या ठाई ठाई ,
चमत्कार तव गुणगानाचा ,वाल्याकोळी चा ही वाल्मिकी ऋषी होई ,
तुलसी -गदिमा कृत तव चरित्र ,कलियुगात ही नैतिकतेचा पाठ देई ,
श्रद्धा -भक्ती जेथे जेथे ,तुझे तेथे दर्शन होई ,
परम भक्ताच्या आर्त हाकेला ,क्षणार्धात तो धावून येई ,
भजो नित मनसे ,राम -राम -सीतामाई ,राम -राम -सीतामाई .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा