मंगळवार, ८ ऑगस्ट, २०१७

मेघ कुंभ

                   मेघ  कुंभ 
काळे -करडे ,लाल -केशरी ,पांढुरके मेघ कलश भरूनि ओसंडती अंबरी ,
जणू धरणी वरती ,सडा शिंपडी ,न्हाऊन नटलेली नाजुक नारी ,
जल -मृत्तिकेच्या महामिलनाने ,सुरभित ,रंगित झाली धरणी सारी ,
हरित छटांच्या ,मऊ पोतावर ,वेलबुट्टीची सुंदर विणकारी ,
मधूनच चमके ,सोनेरी किरणांची भरजरी किनारी ,
मिलन मंडपाची कमान सजविण्या ,इंद्रधनूची लगबग न्यारी ,
दिन -रजनी ,सागर -सरिता ,धरणी -आकाश ,आदि -इति चे मिलन तर ,शिव -शक्तीची रूपे सारी ,
निसर्ग सोहळा पाहुनि ,हर्षित झाले ,पंचतत्वातील अणू -रेणू ,जल -थल -नभचर ,सकल नर -नारी .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा