शनिवार, १ ऑगस्ट, २०२०

माननीय श्री घैसास आणि सौ. स्मिता वाहिनी यांस - एक विचार भेट -२६जानेवारी २०२०


माननीय श्री घैसास आणि सौ. स्मिता वाहिनी यांस - एक विचार भेट -२६जानेवारी २०२०  

वाढदिवस आणि पुस्तक प्रकाशनाचा जुळून आला योग मणि -कांचन ,
उभयतांच्या कर्तृत्व अन दातृत्वाला मानाचा मुजरा म्हणून प्रस्तुत करते एक कवन ,
यशवंत -कीर्तिवंत प्रवासात लाभली निगर्वी स्मित हास्याची शिदोरी ,
जणू माय मातीला ओलावा अन सुगंधाला मिळावे रुप सोनेरी ,
द्वैता कडून अद्वैता कडे जाणारा आपला प्रवास ,ईशकृपेने सदा लखलखत राहो भूवरी ,
व्यावसायिक ,सामाजिक ,धार्मिक ,शैक्षणिक सर्वच कामात दिसते ,सकारात्मक चिंतन -मनन ,
यशप्रभा उद्योग मंदिराच्या शिल्पकारांचे ,मनःपूर्वक अभिनंदन ,
शुभ दिवसांचे होवोत ,रौप्य -सुवर्ण -हीरक महोत्सव ,आणि सहस्त्र चंद्र दर्शन ,
शतक महोत्सवी वाटेवर लाभो ,गुरु -आप्त -मित्र -कुटुंबियांची साथ ,पाठीशी राहो गजानन ,
सूर्याची तेजोमय शलाका ,चंद्राचा अमित शीतल प्रकाश ,दिनचक्राला देतात मिळून पूर्ण आकार ,
लक्ष्मी -सरस्वती -दुर्गा आनंदे नांदती ,असा हा संयुक्त परिवार ,
उजव्या हाताने दिलेले ,काळूनये डाव्याला ,असे थोर आपले विचार ,
ईश्वर चरणी एकच प्रार्थना ,आपणास लाभो ,सदा सुयश -सुख -शांती -आयु -आरोग्याचे ऐश्वर्य अपार . 
                                                                               आसावरी जोशी 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा