शनिवार, २८ नोव्हेंबर, २०१५

।। कुटुम्ब ।।

कालमानाने बदलतच राहणार ,कुटुंबाचा अर्थ अन आकार,
thanks giving,नाताळ,होळी,दिवाळी ,असो कोणतेही सणवार,
माणसाला कुटुंबाचा,कुटुम्बाला समाजाचा हवाच असतो आधार,
सुसंस्कृत,संगठित समाजावरूनच कायम,सुराज्याचा मान मिळणार,
     सुराज्याचा मान मिळणार --------


।। संयुक्त कुटुम्ब ।।

लांब -आखूड केसांना सामावून घेते गुंफलेली वेणी,
एका धाग्याने बांधते माळ,छोटे - मोठे,रंगी -बेरंगी,ओघळलेले मणी,
छटा पांढरी चवही न्यारी न्यारी ,विविध गुणांच्या खाणी,
दुधापासुन दही -ताक -साय -खवा -तूप अन लोणी ,
कढवताना तुपाची कणी ,खरपुस बेरीला पण असतेच ना मागणी,
ताकाला हवाच आंबटपणा ,मस्त लागते आंबटसर चवीचे साखर -लोणी,
एकमेकांचे चांगले घेऊन ,मिळून मिसळून सदा असावे जसे दूध अन पाणी,
ज्याला -त्याला मान असावा ,हवी कशाला उणी - दुणी ,
संकट समयी चिंता येथे सतवत नाही ,अन आनंदासी उधाण येते ,येथे सुगीच्या सणी
कुटुंबाचाच स्वर्ग करावा ,खरा पाहिला स्वर्ग कुणी ,खरा पाहिला --------------?



शनिवार, २१ नोव्हेंबर, २०१५

||लग्न -विधी||

साखरपुडा म्हणजे रुपया -नारळ ,खण -कापड -अंगठी देऊन ,तोंड गोड करून ,लग्न जमलेहो सांगण्याचा शिष्टाचार ,
लग्नाच्या आधी अक्षत देवदेवक केळवण अश्या अनेक विधींचे सोपस्कार ,
कार्य व्यवस्थित पार पडावे यासाठी ,देवांचे आशिर्वाद अन सर्वांच्या सहकार्याची  असते गरज फार ,
वाग्निश्चय ,सीमांतपूजन ,वरमाला ,कन्यादान ,लाजाहोम ,सप्तपदी म्हणजे खरा लग्नाचा बार ,
कानपिळी म्हणजे बहिणीच्या सुखासाठी ,भावाला मेहुण्याचा कान पिळण्याचा अधिकार ,
गृह प्रवेश ,लक्ष्मि पूजन ,झाल म्हणजे ,या घरात नववधू च्या सुखासाठी आम्ही सासरचे राहू जवाबदार ,
लग्न -विधी ने देव ब्राह्मण आप्तांच्या साक्षीने वधू -वर होतात जन्मोजन्मीचे जोडीदार . 


लग्नविधी -थोडी गम्मत
सासूने मांडीवर बसवून आरश्यातून ,सून -मुलाला बघायचे म्हणजे सुनमुख ,
अंतर ठेवून जवळिक ठेवण्यात ,आहे खरे सुख ,
मुलगा दुरावला ,याचे करत बसायचे नसते दुःख ,
गुरुजीपण मजेशीर ,म्हणाले थोडक्यात आहे गोडी ,
मांडीवर घेतले तर बसायचे प्रेमाने ,त्याची करायची नाही शिडी .

||मुलगी आणि सून ||

आपली लग्नाची मुलगी गहूवर्णी -मध्यम बांध्याची ,दुसऱ्याची ती जाडी अन सावळी ,
दुसऱ्याची ती बुजरी ,अबोल ,बावळी ,आपली ती साधी सालस ,भोळी ,
लेक तेवढी स्पष्टवक्ती ,सून तेवढी अति फटकळ मिळाली ,
आपली मात्र काटकसरी ,दुसरीला मात्र कंजूस म्हणून लेबल कपाळी ,

मुलगा गेला सुनेच्या मुठीत ,जावई किती भला ,लेकिचा शब्द पडू देतनाही खाली . 

शुक्रवार, २० नोव्हेंबर, २०१५

।। कलामांना सलाम ।।


१५ऑक्टोबर जागतिक विद्यार्थीदिन घोषित केला आहे त्या निमित्त कलामांना सलाम.

ज्ञान-विज्ञान साधेपणाची पिसे लेऊन अग्नि-पंखांनी घेतली भरारी,
राष्ट्रपती असून राजकारणी नसणे हा आदर्श-पाठ तर खूपच भारी,
आशावादी स्वप्नांचा संदेश तरुण पिढीला देत राहिल उभारी,
स्वप्ने पहात झोपण्यापेक्षा, स्वप्ने असावीत झोप उडवणारी,
आषाढीला झाली सफळ-सम्पूर्ण धर्मातीत,पंथातीत पंढरीची वारी,
कलामांना सलाम नमस्ते, नमन-वंदन, hatsoff कितीतरी भाव येती उरी.

।। Netizens ।।

सर्वांच्या भेटी झाल्या की खूप छान वाटते,पण कधीतरी दुधाची तहान ताकावर भागवावी लागते. अश्यावेळी जगात कोठेही असलो तरी social sites मुळे आपण एकमेकांच्या संपर्कात राहू शकतो, हेही नसे थोडे. त्या विषयी चार ओळी पेश  करते  नाव आहे Netizens.

पूर्वीचे firstclass आणि अगदी ६०% मिळवलेले matric आणि graduate,
without कॉम्पुटर, समजले जातात illetrerate,
पूर्वी अनेक कामांना लावावी लागे तासनतास line,
आता घर बसल्या ,कामे होतात online,
पूर्वी दोन्ही हाताने लिहिणारे एकमेव गांधीजी,
आता texting च्या जमान्यात सगळेच झाले गांधीजी,आणि अजून काय काय ३G ४G.
social sites चा सर्वांना केवढा वाटतो आधार,
पण नेट शिवाय सब कुछ बेकार,
याचा अतिरेक ही एक प्रकारचा जणू आजार,
मग मनसोपचर आणि परिसंवादांचा भडीमार,
मग मलाही सुचल्या गामातीशीर ओळी चार,
जन्माला आल्या नव्या म्हणी आणि नवनवे वाग्प्रचार,
म्हणे, प्रत्यक्षात विचारात नाही कुत्र त्याला facebook वर हज्जारो मित्र,
आपले ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे पाहायचे वाकून, 





जगण्यासाठी आवश्यक अन्न-वस्त्र-निवारा, आणि त्यात wi -fi हवाच हवा,
पण मना-मनांना जोडणारा हरवलाय दुवा,
वाचून असल्या comments, मस्तच होते entertainment,
netizens साठी available किती तरी sites,
पण नात्यात नाही ओलावा नुसते पडीक day & night,
पण मला असे वाटते, negativity शोधण्याची ही तर height,
काबुल आहे, कोणत्याही गोष्टीचे addiction असतेच वाईट,
पण बिचाऱ्या net चा काय दोष ??? neticates पाळावेत आणि वापर असावा right, 

shock बसतो म्हणून, आपण सोडाला कां lawayacha light?
कामे सांभाळून, अधून मधून site कारावी open.

आता आजचेच बघा ना सगळया programme मध्ये आहे कसे perfection . 
सारे काही सोपे झाले कारण होते net conection . 



|| E-education ||

घरात सगळे engineer,माझे शिक्षण economics आणि literature (चला कुठेतरी e आहे),
घरातल्यांनी केला प्रयत्न शिकवण्याचा computer,जमलेच नाही गरज नव्हती जोवर,
मुले गेली परदेशी दूरवर, चैन पडेना घरभर, मुले म्हणाली घाबरतेस का? प्रयत्न तर कर,
चालत रहा सूचना आणि symbol च्या तारेवर,मोडला तरी चालेल, बदलायाचाच आहे comptuer,
भिती थोडी कमी झाली, भर दिला शिकण्यावर, काळजी करत बसण्या पेक्षा भेट होईल email वर,
मुलांकडे गेल्यावार laptop बसला मांडीवर, आधी keyboard मग mouse, मग बिळातला उंदीर,
नाचूलागाला तालावर, जरा अंगवळणी पडतय तर touchpad ने मात केली mouse वर,
आता दात पडायच्या वयात, खायचा कसा apple चा गर,
पुस्तकांचे पसारे, वजन, notes काही नको, मग माया जडली जादुई पाटीवर,
मनात येईल ते वाचावे ,२४/७ google वर ,
म्हंटले, आपले इंग्लिश कच्चे आहे, autocorrection चा करू वापर,
कसलेकाय फसले उपाय, कळेचना हा शाप का म्हणायचा वर,
म्हणे स्वतःचे डोके वापरतनाही अगदी obedeint आणि follower,
पण फारच आहे sensitive, इकडे -तिकडे चालत नाही, आवर असावा बोटांवर,
बघता-बघता हाच झाला, guide-friend-philosopher,
भाषा धर्म देशांच्याही सीमा नाहीत, हा तर आहे वसुधैव कुटुम्बकम चा founder member,
अनेक प्रवाहांना सामावून घेणारा, हा तर एक अथांग सागर,
modern technology चा धर्मच तो तर, बदलत राहणे भरभर,



करतोच ना आपण दात, डोळे, knee replace, आतून बाहेरून बदलत रहावे
चालण्यासाठी जगाबरोबर,
आनंदाची गुरुकिल्ली सदा असावी स्वतः बरोबर.

R