सोमवार, ३१ ऑगस्ट, २०२०

अनंत चतुर्दशी

          अनंत चतुर्दशी 
ओमकार स्वरूप तू ,तू प्रथमेश तू अनंत ,घेऊनि पूजा -अर्चा आणि शिदोरी ,
बुद्धी - रिद्धी -सिद्धी विधाता ,गौरी नंदन आज निघाला निज घरी ,
प्रवास लांबचा आहे तरी ,लंबोदरा -एकदंता-विनायक करणारच तू मूषका वरी ,
पाऊस -उन्ह खेळ करि ,ब्रह्मकमळाने धरले छत्र ,गणपती -गज वदना च्या शिरी ,
भालचंद्र तू अथर्व -अमोघ तू ,सुख कर्ता -दुःख हर्ता ,स्मरण तुझे मंगलकारी ,

निरोप देऊ या बाप्पा मोरयासी ,”पुढच्या वर्षी लवकर ये ”च्या गजरी .

शनिवार, २२ ऑगस्ट, २०२०

प्रतिभा हेमंत -सहस्त्र चन्द्रदर्शन

        प्रतिभा हेमंत -सहस्त्र चन्द्रदर्शन 

उजाडला दिन सोनियाचा नसे आनंदासी पारावार ,

सहस्त्र चंद्र दर्शन सोहळ्या निमित्त एकच शुभेच्छा ,उभयतांना लाभो सुख -शांती-आयु-आरोग्याचे ऐश्वर्य अपार ,

मुले -सुना-जामात -नातवंडे जणू प्रतिभामय स्थापत्याचे स्तंभ ,वेलबुट्टी ,आत्मालंकार ,

जन्मदाते पाया अन “हेमंती ”कळसाने लाभला मंदिरासी पूर्णाकार ,

कर्तृत्व ,दातृत्व ,व्यवहार ,आदर ,सत्कार ,शिकण्या सारखे गुण बहु ,मोजता ते कसे येणार ,

पुण्यनगरी जाहली उभयतांची कर्मभूमि ,एकमेकांसी पूरक आदर्श जोडीदार ,

होऊन दीपस्तंभ दाखविली दिशा ,दूर केलात अनेकांच्या द्विधा मनस्थितीची अंधकार ,

सूर्याचे तेज ,चंद्राची शीतलता ,लक्ष्मी -सरस्वती एकत्र नांदे असा हा आदर्श परिवार ,

कुटुंब ,आप्त ,मित्र सकलांची सुंदर गुंफण करणारा ”हेमंत -प्रतिभा नामक आदरणीय सुवर्णकार ,

होवो शताब्दी कडे वाटचाल ,हीच  करुनि प्रार्थना ,ईश्वर चरणी शतशः नमस्कार . 

                                                           आसावरी जोशी 

रविवार, १६ ऑगस्ट, २०२०

अग्निपरीक्षा

अग्निपरीक्षा 

आज अचानक , एक विषाणू ,बन खडा भस्मासुर ,

सारी दुनिया अलग अलग वजहोसे चिंतातुर ,

हरपल मर मरकर ना जी ,उभर डर से उपर ,

असुर तो आते जाते ही रहेंगे ,रूप बदल बदल कर ,

कोरोना से डरोना ,लडना होगा मानवता को यम -नियमोका पालन कर ,

मुश्कील घडी ही सिखलाती  हमको पितल -सोने में अंतर ,

स्वीकृती -संस्कृती—स्वाभिमान -अस्तित्व की करनी होगी रक्षा ,अग्नि परिक्षा देकर ,

बहुतेरे कह गये संकट को समझो एक सुनहरा अवसर ,

होनाही होगा हम सबको , परिश्रम पूर्वक आत्म निर्भर ,

ए जिंदगी,कुछ अच्छा कर गुजर , जीवन हो जाए सदा के लिये अमर ,

“वसुधैव कुटुम्बकम “का मंत्र हो  हम सबकी जिव्हा पर . 

                आसावरी जोशी

शनिवार, १५ ऑगस्ट, २०२०

अयोध्येतील श्री राम मंदिर भूमिपूजन हस्ते -पंतप्रधान श्री नरेन्द्र मोदी—बुधवार दिनांक पाच ऑगस्ट २०२०

                   अयोध्येतील श्री राम मंदिर भूमिपूजन 
                 हस्ते -पंतप्रधान श्री नरेन्द्र मोदी—बुधवार दिनांक पाच ऑगस्ट २०२०
अयोध्या नगरीत अभिजीत मुहुर्ती ,श्री राम मंदिराचे ,होते का ते केवळ भूमि पूजन !!
ते तर आपुल्या धर्म -पुराण—इतिहास -कला—साहित्य -संस्कृती अन वचन—पूर्तीचे जतन ,
आदर्श ठरले संत -महंत विभिन्न प्रतिनिधी अन राष्ट्र प्रमुखांचे सेवाभावी वर्तन ,
लघु असो वा महत्तम ,अफाट काटेकोर होते ,या सोहळ्याचे पूर्व -पश्चात नियोजन ,
रामनामाच्या सागरी ,भक्ती -सरितेचे झाले दीर्घ विरहा नंतर मिलन ,
बत्तीस वर्षांची होती तपस्या ,पंचतत्वांच्या साक्षीने नव-शिळांचे झाले पूजन—अर्चन ,
खूप काही शिकवुनि गेले ,राष्ट्रप्रमुखांनी केलेले साष्टांगसह वंदन ,
“जय सियाराम “च्या घोषाने अधोरेखित झाली ,स्त्री शक्तीची आन -बान -शान ,
समयोचित संदर्भ देऊन ,आबाल -वृद्ध—वैद्यांचा वृद्धिंगत केला मान ,
आत्मनिर्भरते सोबत देऊ केले ,भारतीय असल्याचे अमूल्य आत्मभान ,
सर्वोत्तम मानवी मूल्यांचे -गुणांचे स्वरुप म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम राम ,
त्याग -तपस्या-प्रेम -करुणा-कर्तव्य-बलिदान -न्याय आदिंची मूर्ति म्हणजे राम ,
कौसल्येचा पोटी ,दशरथ ओटी ,शरयूकाठी ,अवधवासीयांच्या ओठी “लल्ला राम ”एकच नाम ,
विराम म्हणजे थांबणे ,गती -प्रगती हवी तर आयुष्यात हवाच कालातीत-देशातील -दिशादर्शक राम ,
नरेंद्राने रोवले रोप ,का !पारिजातकाचेच ,पवित्र मंदिर परिसरी ,
आणले होते या स्वर्ग फुलासी श्री कृष्णानें ,स्वर्गतुनी भूवरी ,
धर्म -पुराण-आयुर्वेद -साहित्यात असे मान ,सकल देवी -देवतांसी प्रिय ,शोभे त्यांच्या शिरी ,
रंग -सुगंध-नाद नाजुक -मखमली स्पर्श ,सोबतीला औषधी गुण नानापरी ,
तन-मन-धन अर्पित करणाऱ्या सुबुद्धांची ,वाढत राहो वंश वेल ,द्या वरदान ब्रम्हा -विष्णु-कैलाशपती ,
कार्य सिद्धीस जावो हीच प्रार्थना ,प्रथम पूजनिय गौरी नंदन गणपती ,
रक्षण करण्यासी समर्थ आहे ,चिरन्जीवी -रामदास-हनुमान-अंजनी पवन सुत-राया मारुती . 
                                        आसावरी जोशी . 

शनिवार, १ ऑगस्ट, २०२०

Alok 40th birthday



आलोक -चाळीसाव्या वाढदिवसा निमित्त काही खास आठवणी आणि शुभेच्छा . 
                    गुरुवार दिनांक २३फेब्रुवारी १९७८हा दिवस ,माझ्या आयुष्यातील कॅलेंडर मधील ,एक सोनियाचा दिन . म्हणून कदाचित आम्ही आलोकल  लहानपणी सोनू म्हणायचो . आलोक लहानपणापासूनच शांत ,स्वावलंबी ,मोठ्यांचा मान राखणारा ,लहानांना प्रेमाने मदत करणारा ,निश्चयी ,मितभाषी पण मिष्किल ,मोजके पण जिवलग मित्र असलेला . व्यवस्थित जेऊन सुद्धा शरीरयष्टी मात्र फारच किरकोळ . अर्चना -आलोक -अनिरुद्ध ही भावंडे फारशी भांडलेली मला आठवत नाही . एक गम्मत सांगाविशी वाटते ,लहानपणी तो अंक आणि अक्षरे उलटी लिहायचा ,मिरर इमेज सारखी . तीन ला सहा आणि सहाला तीन तर हमखास . तोच प्रकार कुलुप -किल्ली च्या बाबतीत . पण प्राथमिक शाळेत पहिला -दुसरा क्रमांक सोडला नाही . कधी चारू पहिला तर कधी आलोक पहिला . 
          चिकाटी आणि हार्डवर्क च्या जोरावर बारावी बोर्डात नंबर आला आणि इंजिनिअरिंग ,एम . एस . ,पीएच . डी . असे टप्पे पूर्ण केले . पर्ड्यूला कोराफासच्या अवॉर्ड साठी नॉमिनेशन झाले तेव्हा आणि पीएच . डी . ग्रॅज्युएशन सेरेमनी चा वॉक पाहताना अभिमानाने ऊर भरून आले . पुढे नोकरी ,लग्न ,बाबा म्हणून ही प्रमोशन मिळाले . 
          आता आलोक -अनन्या -अर्चित पुण्यात आल्याने माझा आनंद गगनात मावेनासा झालाय .
                                                                                                                         आई

                   चाळीसावा  वाढदिवस 
     आलोक आम्हां सर्वांकडून खूप खूप शुभेच्छा ,आज तुझा वाढदिवस चाळीसावा ,
पहाटे उठल्यावर  अर्चित  चा हसरा चेहरा  तुला सदा दिसावा ,
अनन्या  चा प्रेमळ सहवास शतकपूर्ती पर्यंत लाभावा ,
जन्मदात्यांना तुझा सदैव स्वाभिमानच वाटावा ,
चाळीशीच्या चष्म्यातून ,सकारात्मक बहुआयामी दृष्टिकोन तू जपावा ,
यश -कीर्ती -संपत्तीचा लौकिक -अलौकिक खजिना ,सत्कार्यासाठी खर्चुन वाढवावा ,
मैलाच्या दगडाने भूत -भविष्य सांधून ,गुरुकृपेने जीवन प्रवास सुकर -सफल व्हावा
चाळीशी म्हणजे काय ,जणू अठरा वर्षाच्या सज्ञान -सतेज रत्नाला बावीस वर्षाच्या स्वानुभवाचे कोंदण लाभावे ,
एकच प्रार्थना सुखी -समाधानी चिरायुष्या साठी ,सर्वांच्या शुभेच्छा आणि परमेश्वराचे आशिर्वाद सदा तुझ्या पाठीशी असावे .
                                                                                                                                                           आई 

. अनिरुद्धच्या चाळीसाव्या वाढदिवसा निमित्त -काही आठवणी आणि शुभाशिर्वादाची एक कविता --



     .  अनिरुद्धच्या चाळीसाव्या वाढदिवसा निमित्त -काही आठवणी आणि शुभाशिर्वादाची एक कविता -------
            २०जानेवारी १९८०या दिवशी कोणत्याही अडथळ्यांची चिंता न करता जन्माला आलेले आमच्या वंश -वृक्षाचे हे शेंडेफळ . दोन वर्षापेक्षाही कमी अंतर असलेला -आलोकचा जणू पाठिराखाच . आलोक -अनिरुद्धला जुळ्यांप्रमाणेच वाढवलेले आठवतंय मला . 
            तीक्ष्ण बुद्धी आणि इतरांवर छाप पडेल असे व्यक्तिमत्व असलेला . आमच्या कडे पूर्वी पाहुण्यांची बरीच वर्दळ असायची . पुण्याला कोणी शिक्षणासाठी ,कोणी नोकरीसाठी ,कुणी उपचारासाठी तर कुणी सहज पुणे बघण्यासाठी आमच्या घरी येत असत . सहा ते साठ वयाच्या सर्वांशी लाघवी पणाने बोलून आपलेसे करून त्यांना कम्फर्टेबल झोन मधे आणणारा हा माझा मनकवडा मुलगा ,म्हणून कदाचित याला लहानपणी लाडाने आम्ही' मोनू 'म्हणत असू . ताई -दादा चे मित्र -मैत्रिणीनशी याची खास मैत्री . त्यांच्या सर्व वस्तू कुठे असतात ?आई मीठ मोहरी ,डाळ -तांदूळ कुठे ठेवते याची त्याला बारिक माहिती असत . चौकस बुद्धी आणि तीक्ष्ण पंचेंद्रिय असल्याने आजूबाजूच्या बऱ्याच गोष्टी त्याला माहीत असत . अभ्यास मात्र उडत -उडत करायचा ,त्यामुळे त्याला बरेच वेळेला ,ओरडा बसायचा . पण परिक्षेत मार्क मात्र उत्तम असायचे . शाळेत आदर्श विद्यार्थी ,आणि पालकांनाही आदर्श पालकांचा मान मिळवून देणारा हा आमचा मुलगा !!!!
       अर्चनाताईने लहान भावाचे नाव अनिरुद्ध ठेवायचे असे सांगितले . आणि आम्ही तेच नांव ठेवले . नावाप्रमाणे कोणत्याही रोधकाची पर्वा न करता ,बारावी टेक्निकल ,सी . ओ . ई . पी . मधे प्रॉडक्शन इंजिनियरिंग ,आणि अमेरिकेतील सिनसिनाटीहून एम . एस . होऊन नोकरीत स्थिर -स्थावर झालेले गुणी बाळ ते !!!चारुताचायोग्य जोडीदार  शुभम -मुक्ताचा प्रेमळ बाबा ,मुलगा ,जावई ,भाऊ ,मामा -काका अशी सर्व नाती जवाबदारीने अन प्रेमाने सांभाळणारा . अमेरिकेतून आईला रोज फोन करून हाल -हवाल विचारणाऱ्या या माझ्या मुलाचे माझ्या बऱ्याच नातेवाईकांना आणि मैत्रिणींना कौतुक वाटते .
दूरदेशी गेल्यावरही, रोज येणारा  तुझा फोन, जणू माझ्या प्राण वायूला संरक्षक कवच देणारा ओझोन...      
                                                                                                                               आई         

      अनिरुद्ध आम्हां सर्वांकडून खूप खूप शुभेच्छा ,आज तुझा वाढदिवस चाळीसावा ,
पहाटे उठल्यावर शुभम -मुक्ताचा हसरा चेहरा  तुला सदा दिसावा ,
चारुताचा प्रेमळ सहवास शतकपूर्ती पर्यंत लाभावा ,
जन्मदात्यांना तुझा सदैव स्वाभिमानच वाटावा ,
चाळीशीच्या चष्म्यातून ,सकारात्मक बहुआयामी दृष्टिकोन तू जपावा ,
यश -कीर्ती -संपत्तीचा लौकिक -अलौकिक खजिना ,सत्कार्यासाठी खर्चुन वाढवावा ,
मैलाच्या दगडाने भूत -भविष्य सांधून ,गुरुकृपेने जीवन प्रवास सुकर -सफल व्हावा
चाळीशी म्हणजे काय ,जणू अठरा वर्षाच्या सज्ञान -सतेज रत्नाला बावीस वर्षाच्या स्वानुभवाचे कोंदण लाभावे ,
एकच प्रार्थना सुखी -समाधानी चिरायुष्या साठी ,सर्वांच्या शुभेच्छा आणि परमेश्वराचे आशिर्वाद सदा तुझ्या पाठीशी असावे .
                                                                                                          आई  






. नव वर्षाभिनंदन

 .        नव वर्षाभिनंदन 
 सर्वांना नव वर्षाचे खूप खूप अभिनंदन ,
 अमूल्य आयुष्याला देऊया नाजुक नात्यांचे कोंदण ,
आजी =गोड गोड लाडू -वडी ,मऊ साडीची गोधडी ,जादुई मिश्रणाची हवीहवीशी पुडी ,
आ +बा =आई -बाबांच्या संचिताची प्रवाही माया ,विशाल वटवृक्षाची घनदाट छाया ,
आ +ई =आत्मा +ईश्वर ,कर्तव्य अन प्रेमाचा झरा अनश्वर ,
बा +बा =मुलांच्या बारश्या पासुन बाशिंग बांधे पर्यंत त्याला माहित नाही आळस ,
            कुटुंबाच्या इमारतीचा ,तोच पाया ,तोच कळस ,
भा >ऊ =लहान असो वा मोठा ,बहिणीच्या पाठीशी कायम ऊ <भा ,
दुहिता =सासर -माहेर 'दुहि 'कडचे 'हित 'जपणारी ,ती कन्या -भगिनी -पत्नी -माता ,
मुले =थोरा मोठ्यांने  ,ईश्वराने दिलेला परमानंदी ,अमूल्य असा 'दुवा '
स >खा =सख्यांपेक्षा 'खा <स 'मृगनाभीतील दरवळणारा कस्तुरीचा वास ,
परमेश्वर =दिसत नसला तरी ,वाऱ्या सम येतो अनुभवता ,तो तर आहे अनादि -अनंत -अक्षर ,
             माणुस नसेना पण माणुसकी असते अमर ,ती जपूयात साक्षीला ठेवून ईश्वर .