शनिवार, २ सप्टेंबर, २०१७

साक्षरता दिन (८सप्टेंबर )

                         साक्षरता  दिन (८सप्टेंबर  )
साक्षरतेची नको नुसती टक्केवारी ,नकोत नुसते परिक्षार्थी ,
वाचाल -लिहाल तरच वाचाल ,बनून रहा सदा शिकणारा विद्यार्थी ,
मुलगा -मुलगी ,आबाल -वृद्ध ,सर्वांनी असावे ज्ञानार्थी ,
ज्ञानार्जना साठी बनू स्वार्थी ,ज्ञानदानात परमार्थी ,
माहितीचे नसावे नुसते संकलन ,ज्ञान असावे सदुपयोगी अन   व्यवहारार्थी ,
साक्षर म्हणजे सुसंस्कृत जवाबदार माणुस ,हक्का सोबत कर्तव्याची जाण हवी ,
अंधारा कडून प्रकाशा कडे ,अज्ञाना कडून ज्ञाना कडे जाणारी, वाट शोधू सदा नवी ,
शून्यालाही येते किंमत ,त्याच्या पुढे एक होऊन उभे राहण्याची ,ताकत आणि जिद्द हवी . 

मंगळवार, ८ ऑगस्ट, २०१७

मेघ कुंभ

                   मेघ  कुंभ 
काळे -करडे ,लाल -केशरी ,पांढुरके मेघ कलश भरूनि ओसंडती अंबरी ,
जणू धरणी वरती ,सडा शिंपडी ,न्हाऊन नटलेली नाजुक नारी ,
जल -मृत्तिकेच्या महामिलनाने ,सुरभित ,रंगित झाली धरणी सारी ,
हरित छटांच्या ,मऊ पोतावर ,वेलबुट्टीची सुंदर विणकारी ,
मधूनच चमके ,सोनेरी किरणांची भरजरी किनारी ,
मिलन मंडपाची कमान सजविण्या ,इंद्रधनूची लगबग न्यारी ,
दिन -रजनी ,सागर -सरिता ,धरणी -आकाश ,आदि -इति चे मिलन तर ,शिव -शक्तीची रूपे सारी ,
निसर्ग सोहळा पाहुनि ,हर्षित झाले ,पंचतत्वातील अणू -रेणू ,जल -थल -नभचर ,सकल नर -नारी .

शुक्रवार, ४ ऑगस्ट, २०१७

होरी

                     होरी 
होरी आई जी ,देखो होरी आई ..... 
गिले -सुखे रंगो की होनेदो  दिलसे दिल की जमाई ,
साल और महिनोंकी ,करनी होगी खुशी -खुशी बिदाई ,
इसी बिदाई से जनमेगी ,नये साल की नई बधाई ,
प्रीत की एक अनोखी रीत ,फागुन ने सिखलाई ,
गोरी रंग गई श्याम रंग में ,अखियोंको दुजा रंग ना दे ,कोई दिखाई !!
राधा कहे -तेरा तुझको अर्पण ,अपनालो  हरदम के लिये  मेरे श्याम कन्हाई !!

शुक्रवार, २८ जुलै, २०१७

सदगुणांची उंची

                      सदगुणांची उंची 
सौंदर्य -संपत्तीचा करू नये कधी गर्व ,
काही काळा नंतर नाश पावणार असते हे सर्व ,
विद्याविभूषित ,उच्चपदस्थ ,सद्गुणी असणे चांगलेच असते ,
पण निरपेक्ष मदत गरजुंना अन माणुसकी ,गुणांची उंची वाढवत असते ,
कधीच करू नये कुणाच्याही व्यंगावर विनोद ,
मात्र इतरांच्या गुणांचे करावे कौतुक ,वाढवावी त्यांची उमेद ,
शेवटी पंचतत्वातच विलीन व्हायचे आहे ,प्रत्येक 'माणसाला',
ब्रँड ,फॅशन ,खिसा ,किमतीचे लेबल काहीच नसते 'कफनाला '. 

रविवार, २३ जुलै, २०१७

परसबाग -एक जिवलग मैत्रीण

                            परसबाग -एक जिवलग मैत्रीण 
या वर्षा ऋतुतील अनोख्या ब्रह्मकमळाचा पंचम फुलोरा ,
सोबतीला तगर -कण्हेर ,अनंत -गुलाब अन सुवासिक मोगरा ,
रंगी -बेरंगी सदाफुली ,सदा परसबागेत मिरवी तोरा ,
गुणगुणायला भाग पाडी ,जाई -जुई ,सायली -अबोलीचा पाठीवर लोळणारा गजरा ,
पवित्र सुवासिक दवणा -मरवा -तुळशी ची पाने आणि मंजिऱ्या ,
आले ,पुदिना ,गवती चहा ,कढीपत्त्याचा स्वाद अन गुणधर्म न्यारा -न्यारा ,
गणेशाला प्रिय एकेरी, दुहेरी ,मुकी ,लाल चुटुक जास्वन्द अन दुर्वा एकविस /अकरा ,
विडा ,सुपारी ,नारळ मानाने मिरवी ,पूजा असो वा दिवाळी -दसरा ,
सणा -वारी रंगी बेरंगी ,सुंदर ,सुवासिक फुले ,फळे ,पत्री मुळे देवळाचे रुप येती घरा घरा ,
कधी प्रासंगिक ,मौसमी सजीव अलंकारांनी सजती वसुंधरा ,
तर कधी सार्थ दीर्घायु घेऊन  ,बीज अंकुरती धरणीच्या उदरा ,
थकलेल्या तना -मनाला ,परसबाग जिवलग मैत्रिणी सम ,कायमच देत असते आसरा ,
बागेतील फेरफटका शिकवी ,निसर्गा सम परमार्थ शिकविणारा ,मोठा गुरु नसे दुसरा .

गुरुवार, ६ जुलै, २०१७

. प्रार्थना

                  .          प्रार्थना 
तूच जन्मदाता पिता ,तूच पालन-पोषण करणारी माय -माऊली ,
भाऊ -बहीण तूच ,तूचि 'मितवा 'वाळवंटातील सावली ,
तूच सर्वस्व -शक्ती -संपत्ती -सरस्वती ,
तव गुणगानाची आमची कुवत ती किती !!
सांभाळुन घे ,सदा दे आम्हांसी सन्मती !!
तव चरणी मस्तक टेकुनि ,हीच करते विनती !!

बुधवार, ५ जुलै, २०१७

रिश्ता

            रिश्ता 
दो दिलोंकी मिटाने केलिये दूरियां ,
चुम्बक सा काम करती हैं ,एक दूजे की खूबीयां ,
कुछ रिश्ते ऐसे बनते हैं कि ,देखते रह जाती है सारी दुनिया ,
सुनेने में अजीब पर सच है ,'स्पेस 'देने से 'सेफ 'रहती हैं नजदिकीयां ,
अगर निभाना है तो जिंदगी में कम करनी होंगी मनमानीयां ,
और भी अच्छा है ,यदि खूबियों के साथ मंजूर कर ली जाय ,माफ़िक खामियां ,
चमक -धमक ना भी हो ,चहकती -महकती जिंदा होनी चाहिये वादियां ,
खुशियां पाना और देना दोनो होती हैं ,समझदार पक्की सहेलियां ,
रिश्ता वही जो यादों  को ,सहेज सके कई सदियां ,यादोंको ....