शनिवार, १ ऑगस्ट, २०२०

Father'sday nimitt aksharmaletil ek prastuty.----' बाबा -बा +बा

 Father'sday nimitt aksharmaletil ek prastuty.----'                  बाबा -बा +बा
बारश्या पासून बाशिंगा पर्यंत ,ज्याचा वाटतो भक्कम आधार ,
घोडा -घोडा होणारा ,सायकल शिकवणारा ,मोडलेले दुरुस्त करणारा शक्तिवान अन हुशार ,
अधून -मधून त्याच्या मुळे आई चा नकार सुद्धा होतो होकार ,
आजारपणात आईची माया अन बाबांची धावपळ करून केलेले उपचार ,
स्वतः हून सल्ला देत नाही ,एकदा का झाले हातचार ,
मागितलातर देतो सल्ला ,भावने पेक्षा त्यात असतो व्यवहार ,
लवकर जाऊन उशिरा येतो ,पण मुलांना पुरतो सुट्टीचाही एक वार ,
आधुनिक बाबा तर खूपच झालाय जवाबदार ,
अपत्य जन्माच्या वेळेस ,मॅटर्निटी लीव्ह चा हक्क आणि जवाबदारी चा पायंडा पाडणारा ,
आईच्या खांद्याला खांदा लावून ,कुटुंबाची जवाबदारी घेणारा ,
अडीअडचणीत 'वर्क फ्रॉम होम 'करणारा ,
म्हणजे साईड बाय साईड 'वर्क फॉर होम 'करता येते म्हणणारा ,
हाऊस वाईफ प्रमाणे ,हाऊस हसबँड या शब्दाची देणगी ,शब्दकोषाला देणारा ,
काळाच्या गरजे प्रमाणे बदलायला घेत आहे पुढाकार 
स्वतः च्या गरजा कमी करतो ,मुलांसाठी राबराब राबणार ,
अश्या आदर्श बाबाला मुले कशी बरे विसरणार ?मुले नाही च विसरू शकणार .
Happy fathers day.
                                      Asawari joshi

एकसष्ठी एक मैलाचा टप्पा

                एकसष्ठी एक मैलाचा टप्पा 
विश्वास -प्रेम -कर्तव्य -कल्पना अन कष्टाने गुलाब झाले काटे ,
मिळुनी संसाराचे पवित्र-प्रसन्न , मंदिर बनविले छोटे ,
दत्तप्रसादाचा लाभ मिळण्यास ,भाग्य लागते मोठे ,
आयुष्यातील मैलाचा टप्पा ,साठी अन एकसष्ठी ,
पूर्वार्धाच्या अनुभवांची ,शिदोरी असते गाठी ,
उत्तरार्धात देते आधार ,जशी चालत असता काठी ,
काय कमवले ,काय गमवले ,काय राहिले !चा टप्पा असतो 'साठी '
नैसर्गिक विस्मरणाला नको देऊ या नांव -"साठी बुद्धी नाठी "
चूक -भूल देऊ -घेऊ ,नाजुक नाती जपण्या साठी ,
विस्मरणाचा घेऊ लाभ ,मागू क्षमा -करु क्षमा ,अलगद उकलू गुंतागुंती ,
उगवती अन मावळती मधले क्षण हे जीवन ,साक्षीला असते ,माता आणिक माती ,
एक हात देऊया पुढील पिढीच्या हाती ,अन दुसरा मागील पिढीच्या हाती ,
चढ असो वा असो उतार ,देते आधार निस्वार्थी काठी ,
देऊ आनंद ,घेऊ आनंद ,आनंदाची चावी जपून ठेवूया आप कनवठी ,
उरले -सुरले गुंतवू परमार्थी ,संचित वाढे परलोका साठी ,
छिद्र -पोकळी विसरुनि सारे ,सूर मुक्तीचा ,वेणुस गवसे ,श्रीहरीच्या अधरी -ओठी . 
                                                                     आसावरी जोशी



ओम नमो भारतमाता

                                ओम नमो भारतमाता 
ओम नमो बद्री -केदार , ईश्वर चरणी भक्तजनांचा कोटी कोटी नमस्कार ,
भारत देशी वाढू दे ,शांति -समृद्धी -सामंजस्य -ऐक्य -देशभक्तीचे संस्कार  ,
ओम नमो मर्यादा पुरुषोत्तम ,गोवर्धनधारी ,योगेश्वर ,साकार म्हणा वा निराकार ,
आधी कर्तव्याशी राखू ईमान ,मगच मागू अधिकार ,
ओम नमो कन्याकुमारी -लक्ष्मी -सरस्वती -चंडी -गौरी ,तव  चरणी नमन त्रिवार ,
नको कोरडी माया -ममता ,सोबत असुदे ओलावा अन ,अन्यायाचा तिटकार ,
भारतमातेचा जयजयकार ,भारतमातेचा जयजयकार ,
द्वारकाधीशा -जगन्नाथा -बालाजी -रामेश्वर -काशी विश्वेश्वर ,
स्वाभिमान -स्वधर्म -स्वातंत्र्य रक्षणा साठी ,कृपा असुदे आम्हावर ,
भारत देश तेहतीस कोटी देवांचा शूर -वीर -साधु -संत अन ऋषी -मुनींचा ,
भान राखुया मान राखुया सुजलाम -सुफलाम -वैभवशाली इतिहास -संस्कृतीचा ,
कोटी -कोटी देशबंधूंसह ,वसा घेऊया ,विश्व कल्याण अन विश्व शांतीचा .

गुढीपाडवा

         गुढीपाडवा 
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ,आज नव -वर्षाचे झाले आगमन ,
स्वागताला उभी ,थोडी नमलेली  गुढी, पात्र -वस्त्र  ,रंग -सुगंध ,कडू -गोडाचे सुंदर मिश्रण ,
तसेच नानाविध गोष्टींचे मिश्रण असते आपले जीवन ,
आंबा -कडुलिंबाची  हिरवी फुललेली डहाळी सांगे ,सुख म्हणजे समृद्धी अन स्वास्थ्याचे अजोड मिलन ,
शुभ्र गोड गाठी बनती ,साखरेचे कण -कण विरघळून तापवून ,
नात्यातील अखंड गोडवा टिकवण्या साठी ,छोटीशी गाठ घ्यावी लागते खपवून ,
तोरणातील विविध रंग शिकविती ,आयुष्यातील प्रत्येक प्रवेश बहरु द्यावा त्या त्या रंगात रंगून ,
ठिपके जोडून काढलेली रेखीव रांगोळी सांगती  ,समाजाने  प्रगत व्हावे ,एकमेकासी धरुन ,
आपणासी सुख -समृद्धी -स्वास्थ्य -समाधान घेऊन येऊ दे ,नव -वर्षातील प्रतिदिन . 
                                                                आसावरी जोशी
                 २--गुडीपाडवा  
संवत्सराचे स्वागत करूया गुडी उभारून ,
नात्याचे तोरण ठेवू प्रेमाने बांधून ,
गाठीतील गोडवा सदा असावा जिभेवर टिकून ,
आरोग्य जपायला ,कधीतरी कडूलिंबही घ्यायचा असतो गोड मानून ,
नववर्षाच्या शुभेच्छा देऊ ,सर्वांना हात जोडून ,
सर्वांना सुख -समृद्धी -समाधान लाभो हीच प्रार्थना मनापासून . 
                                     आसावरी जोशी . 

दिन विशेष (जागतिक मातृभाषा दिन )


   दिन विशेष (जागतिक मातृभाषा दिन )
एकवीस फेब्रुवारी हा जागतिक मातृभाषा दिन . एखादा दिन विशेष आला की त्या विषयावर अनेक माध्यमातून लोक आपले विचार मांडत असतात ,मी एका त्रयस्थ या दृष्टिकोनातून मातृभाषे विषयी माझे विचार मांडत आहे ,अर्थात माझी मातृभाषा मराठी असल्याने मी तिला प्रतिनिधी केले आहे . 
 माझा जन्म महाराष्ट्रात झाला (आजोळी ),आई -वडील मराठी म्हणून माझी मातृभाषा मराठी .  वडिलांच्या शेती -बागायती व्यवसायामुळे बालपण ते लग्न होई पर्यंत चा काळ भवानीमंडी -भैंसोदामंडी अश्या राजस्थान -मध्यप्रदेश च्या सीमारेषेवर असणाऱ्या हिंदी भाषिक जोडगावात गेला . त्यामुळे व्यवहार भाषा कोसा कोसावर बदलणारी हिंदी भाषा ,तर शिक्षणाचे माध्यम प्रमाण हिंदीभाषा होते . गावात दोन -चार घरे मराठी होती ,त्यापैकी कुणी इंदुरी मराठी ,कुणी देशावरील तर कुणी कोकणी मराठी बोलत . आमच्या घरात आजी -आजोबा ,आई -वडील ,आत्या हे सर्व मात्र पुणे मुंबईचे प्रमाण मराठी बोलत . आम्ही पाच भावंडे ,शाळा व इतर कारणाने दहा बारा तास घराबाहेर असल्याने बरेचवेळा घरात ही आपापसात हिंदी बोलायला लागायचो . पण आई -वडील त्या बाबतीत कडक शिस्तीचे होते . घरात सर्वांनी एकमेकांशी मराठीतच बोलायचे अशी सक्तीच होतीम्हणा  ना !याचा आम्हाला कधी कधी रागही यायचा . पण आज आम्ही मान्य करतो कि आई वडिलांच्या या आग्रही धोरणाचा पुढील आयुष्यात खूप फायदाच झाला . पुढे मुले मोठी झाल्यावर शेती व्यवसायात रमणार नसून ,नोकरी -व्यवसाय किंवा विवाहोत्तर आयुष्य महाराष्ट्रात घालवणार असल्याचे ,त्यांच्या दूरदृष्टीने हेरले होते . बोलीभाषे व्यतिरिक्त मातृभाषेचे ज्ञान वाढावे म्हणून वडिलांनी पुणे मुंबई निघणारे मराठी वर्तमानपत्र ही लावले होते . पोस्टाने ते दोन तीन दिवस उशीरा येत असे . पण इथे ताज्या बातम्यांपेक्षा दैनिकातील भाषा डोळ्याखालून जाणे त्यांच्या दृष्टीने महत्वाचे होते . मराठी—हिंदी लिपी सारखीच असल्याने फावल्या वेळेत थोडे  मराठी चाळले जायचे . किंवा मोठी माणसे त्यातील कथा आणि मनोरंजनात्मक सदरे वाचून दाखवत . त्यामुळे आम्ही भावंडे कोणत्याही क्लास किंवा परिक्षे शिवाय ,आज ओघवती मराठी बोलू ,वाचू ,लिहू शकतो महाराष्ट्रा पासून दूर राहून सुद्धा ,मराठी साहित्य ,सिनेमा ,नाटक ,लेखक ,कवि यांची निदान तोंडओळख तरी झाली . त्यामुळे पुण्यात बी . एड . करताना ,मराठी माध्यम असून चांगल्या प्रकारे उत्तीर्ण झाले . 
सांगायचा मुद्दा असा की जेंव्हा मातृभाषा आणि शिक्षणाची माध्यम भाषा किंवा व्यवहार भाषा वेगळी असते तेंव्हा पालकांनी तसेच कुटुंबातील मोठ्यांनी ,थोडे सक्तीने, थोडे गोडीगुलाबीने आणि थोडे वातावरण निर्मितीने मुलांना मातृभाषेची गोडी लावायला       
हवी .

   भारतात हल्ली बहुतेकांना तीन -चार भाषा अवगत असतात . मातृभाषा ,राज्यभाषा (१-२),राष्ट्रभाषा आणि अंतरराष्ट्रीय भाषा इंग्रजी . इंग्लिश आल्याशिवाय बाल्याची प्रगती होणार नाही अशी ठाम समजुत असल्याने किंवा मातृभाषेच्या चांगल्या शाळा उपलब्ध नसल्याने ,इंग्रजी माध्यम शाळेत घालण्याचे प्रमाण हल्ली  खूपच वाढले आहे . दुसऱ्या बाजुला पुरेशी विध्यार्थी संख्या नसल्याने मातृभाषेतील काही शाळा बंद कराव्या लागल्या असे समजते . 
    बहुभाषिक असणे चांगलेच ,त्यातील एक मातृभाषा असावी . किमान एका भाषेवर प्रभुत्व असावे ,बाकी भाषा किमान लिहिता -वाचता—बोलता आल्या तरी चालते . मनातील भावनांचे ,विचारांचे आदान -प्रदान महत्वाचे. समोरच्याच्या भाषेत आपण संवाद साधला तर आत्मीयता वाढीस लागण्यास मदतच होते . 
    पहिली वीस -बावीस वर्षे सोडली तर ,पुढील चाळीस -पंचेचाळीस वर्षे पुण्यातच गेली . त्यामुळे तीनही मुलांना आवर्जून मराठी शाळेतच घातले . कारण मराठी मातृ-राज्य—व्यवहार भाषा होती आणि त्या वेळेस चांगल्या मराठी शाळाही उपलब्ध होत्या . पुढे मुले हिंदी ,इंग्रजी ,संस्कृत ही शिकली . मराठी माध्यमामुळे मुलांना इंजिनियरिंग च्या शिक्षणात किंवा अमेरिकेतील उच्चशिक्षण ,नोकरी ,व्यवसायात कोणतीही अडचण अली नाही . 
   आता नातवंडांच्या वेळेस त्यांना मराठी शाळेतच घालावे असा अट्टहास करणे योग्य नव्हे . स्थळ -काळ—वेळ -परिस्थिती प्रमाणे प्रत्येक प्रश्नांची उकल वेगवेगळ्या प्रकारे करावी लागते . दूरसंचार व वाहतुकीच्या साधनांमध्ये क्रांतिकारक बदला सारख्या कारणांमुळे जगातील अंतरे कमी झाली आहेत . एका राज्यातून दुसऱ्या राज्यातच काय पण एका देशातून दुसऱ्या देशात स्थलांतरित होणेही सोपे झाले आहे ,त्यामुळे आंतराष्ट्रीय प्रमाण भाषेला खूप महत्व आले आहे . घरात आई -बाबा दोघांची मातृभाषा वेगवेगळी असली तर बरेच वेळा घरात इंग्लिश बोलले जाते ,तर काही वेळा फॅशन म्हणून इंग्लिश बोलले जाते . आई -बाबा दोघे नोकरी करणारे असल्याने काही मुले घरापेक्षा जास्तवेळ शाळा—पाळणाघर येथे असतात ,मग मुले जी भाषा ऐकतात तीच बोलणार नां !एक गमतीशीर किस्सा सांगावासा वाटतो -एका नोकरी करणाऱ्या मराठी कुटुंबात मुलीला सांभाळायला एक पंजाबी आया होती ,तर ती मुलगी आयांच्या सहवासामुळे आधी पंजाबी ,शाळेत जाऊ लागल्यावर इंग्रजी आणि काही वर्षानंतर थोडे मराठी बोलायला शिकली . मुलीच्या दृष्टीने विचारांची देवाण -घेवाण महत्वाची आणि नैसर्गिक ही होती .
 एकदा शिकलेली भाषा माणूस कधी पूर्ण विसरत नाही असे म्हणतात . तरी बोली भाषेत सरावाला खूप महत्व आहे . लहानपणी मी हिंदी भाषिक राज्यात राहायल्याने आधी हिंदीत विचार करून मग मराठी बोलले जायचे ,आता चार -पाच दशके महाराष्ट्रात ,तेही पुण्यनगरीत राहिल्याने ,हिंदी लिटरेचर मध्ये एम . ए . असूनही थोडे आठवून आठवून हिंदी बोलले जाते . 
   आपली संस्कृती जाणून घ्यायला मातृभाषेची खूप मदत होते . घरातील लोकांशी सुसंवाद साधणे सोपे जाते ,सुसंवादाने अनेक छोटे -मोठे प्रश्न सुटतात . त्याचा मानसिक आरोग्य चांगले ठेवायला उपयोग होतो . एखाद्या भाषे बद्दल प्रेम अवश्य असावे पण अहं किंवा न्यूनगंड नसावा . त्याचप्रमाणे इतरांच्या भाषेला कमी न लेखता तिचा आदर करणे ही आपले कर्तव्य आहे . आदर्श पिढी घडवायची असेल तर मोठ्यांनी आदर्श वर्तन करणे अपरिहार्य आहे . 
  परदेशात राहणाऱ्या माझ्या मुलांची मुले म्हणजे माझी नातवंडे मातृभाषा मराठीत संवाद साधु लागली की माझे ऊर अभिमानाने-आनंदाने भरुन येते . हे मी प्रामाणिक पणे मान्य करून ,एक पाल्य -पालक आणि आजी म्हणून आलेले अनुभव सर्व वाचकांना समर्पित करते . 
                                     आसावरी जोशी 
                               १चिंतामणी अपार्टमेंट ,मधुबन कॉलनी कर्वेनगर ,पुणे -४११०५२
                              सेल -९६८९३९०८०२
                             ई-मेल -asawari51 @gmail . com 

माननीय श्री घैसास आणि सौ. स्मिता वाहिनी यांस - एक विचार भेट -२६जानेवारी २०२०


माननीय श्री घैसास आणि सौ. स्मिता वाहिनी यांस - एक विचार भेट -२६जानेवारी २०२०  

वाढदिवस आणि पुस्तक प्रकाशनाचा जुळून आला योग मणि -कांचन ,
उभयतांच्या कर्तृत्व अन दातृत्वाला मानाचा मुजरा म्हणून प्रस्तुत करते एक कवन ,
यशवंत -कीर्तिवंत प्रवासात लाभली निगर्वी स्मित हास्याची शिदोरी ,
जणू माय मातीला ओलावा अन सुगंधाला मिळावे रुप सोनेरी ,
द्वैता कडून अद्वैता कडे जाणारा आपला प्रवास ,ईशकृपेने सदा लखलखत राहो भूवरी ,
व्यावसायिक ,सामाजिक ,धार्मिक ,शैक्षणिक सर्वच कामात दिसते ,सकारात्मक चिंतन -मनन ,
यशप्रभा उद्योग मंदिराच्या शिल्पकारांचे ,मनःपूर्वक अभिनंदन ,
शुभ दिवसांचे होवोत ,रौप्य -सुवर्ण -हीरक महोत्सव ,आणि सहस्त्र चंद्र दर्शन ,
शतक महोत्सवी वाटेवर लाभो ,गुरु -आप्त -मित्र -कुटुंबियांची साथ ,पाठीशी राहो गजानन ,
सूर्याची तेजोमय शलाका ,चंद्राचा अमित शीतल प्रकाश ,दिनचक्राला देतात मिळून पूर्ण आकार ,
लक्ष्मी -सरस्वती -दुर्गा आनंदे नांदती ,असा हा संयुक्त परिवार ,
उजव्या हाताने दिलेले ,काळूनये डाव्याला ,असे थोर आपले विचार ,
ईश्वर चरणी एकच प्रार्थना ,आपणास लाभो ,सदा सुयश -सुख -शांती -आयु -आरोग्याचे ऐश्वर्य अपार . 
                                                                               आसावरी जोशी 

जीवन आणि जगणे

                                जीवन आणि जगणे 
जन्म -मरणातील अंतर म्हणजे जीवन ,यालाच म्हणायचेका जगणे ?
भूक -भय -निद्रा -मैथुन ची गरज पशूंप्रमाणे माणसाला ही निसर्गचे  देणे ,
मग पशु आणि माणुस यांच्यात फरक काय बरे असतो ,तुका म्हणे ,
मोठमोठ्या तत्वज्ञानीं चे बघुया विचार -सार ,अन बांधूया गाठी ,
जीवन जगावे लागते स्वतः साठी आणि अवलंबून असणाऱ्यांसाठी ,
प्रत्येक भूक भागवण्यासाठी  भाकरी भाजण्यासारखे केलेले  कर्म म्हणजे उपजीविका ,
जगण्याचा खरा हेतू तोही इतरांसाठी ,म्हणजे जीविका ,
ते सुंदर रित्या शिकवतात पंचतत्त्व अन , निसर्गातील फूल अन कालिका ,
माणसा ला पशु पासून भिन्न करणारी भावना -तर्क -विचार -बुद्धी ची देणगी स्वरूप मालिका ,
भाकरी शिळी झाली की त्यातून पसरू लागते दुर्गंधी ,
फुले शिलीच काय ,मृत झाली तरी ती देतात सुगंधी अन फक्त सुगंधी ,
योग्य वेळी सुपंथ धरूया ,माणुस बनुया ,उतरवून अहंकाराची धुंदी अहंगंडाची धुंदी .