शनिवार, ३० जुलै, २०१६

प्रेम -भाग २

      
  


                प्रेम -भाग २
फक्त गरज म्हणून गाठ बांधतात ,सोय म्हणून सहज सोडतात ते प्रेम नसते ,
वादळाच्या हिंदोळ्यात सुद्धा घट्ट पकड असणारे प्रेम असते ,
तनाच्या बँकेत ,मनाच्या लॉकर मधे सेफ ठेवतात ते प्रेम असते ,
एकदा का मोडले तर त्याला रिप्लेसमेंट नसते ,म्हणून ऍडजेस्टमेंट ची गरज असते ,
आंधळे असून सिक्सथ सेन्स ला दिसते ,ते प्रेम असते ,
वेड्यांच्या खोल मनात दडलेले शहाणपण प्रेम असते ,
शेवटल्या श्वासापर्यंत साथ देणारे खरे प्रेम असते ,
सहवासाच्या पलीकडील सह अनुभूति म्हणजे प्रेम असते ,
क्षमा ,तडजोड ,विश्वास ,ओलावा ,आधार युक्त प्रेम परिपूर्ण असते ,
क्षमा म्हणजे चुकीची पुनरावृत्ति करू देणे नव्हे ,तर सूड बुद्धीला तेथे जागा नसते ,
प्रेमाची निश्चित अशी परिभाषा नसते ,प्रत्येकाची अनुभूति वेगवेगळी असू शकते ,
पण तरी प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे ,फक्त प्रेमच असते .

शुक्रवार, २९ जुलै, २०१६

शब्दांचा मार



             शब्दांचा मार 
मारणाऱ्याचा धरता येतो हात ,कोण थांबवणार बोलणाऱ्यांची बात ,
हाताची जखम असते शरीराच्या वर ,शब्दांची खोलवर रुजते मनात ,
वरची जखम बरी होऊ शकते टाकुन कात ,मनावरची करते कायम नको असलेली साथ ,
शब्दांचा सुटलेला बाण कधीच येत नाही कमानीच्या आत ,
आधी विचार मगच उच्चार ,गैरसमज टाळता येऊ शकतात माणसा -माणसात . 

पुस्तक भिशी

       
   


                         पुस्तक भिशी 
भिशीत भिशी पुस्तक भिशी ,विविध विषयांचे वाचन ,
गिफ्ट देताना चर्चा नुसती ,होतनाही पटकन डिसिजन ,
लहान -मोठे -तो -ती ,असो कोणतेही ऑकेजन ,
एखादे पुस्तक भेट द्यावे ,करावे दिवसाचे सेलिब्रेशन ,
एकमेकांशी शेअर करावीत ,असावे पुस्तकांचे रोटेशन ,
सायंस -फिक्शन -फूड इत्यादि ,अनुभव आणि तरल इमोशन ,
ज्ञान वाढते आनंद मिळतो ,रिलीज होते टेन्शन ,
कायम आपली सोबत करतं ,असो परिक्षा -एकाकीपण -किंवा असूदे व्हेकेशन .  




सापशिडी -पेरावे तसे उगवते



                            सापशिडी 
साप शिडीचा पट उघडला ,फासातर तुझा तूच खेळ ,
दान पाडणे हातात असून नसते ,तोतर नशिबाचा खेळ ,
पुढे -मागे गोटी सरकवत ,बसवावा लागतो ताळमेळ ,
नियम खेळाचे माहित हवेत संपू शकतो केव्हाही खेळ ,
छोट्या -मोठ्या शिड्या मिळाल्यातर ,आनंदाची रेलचेल ,
सापाने जर गिळले तर ,फुकट जातो किमती वेळ ,
शेवट पर्यंत खेळायचाच असतो ,तिखट-आंबट -खारट -गोड ,मिश्र चवीची ती तर भेळ ,
चढ -उतार -धक्के अन वळणेघेत ,डेस्टिनेशन गाठते ,आपली रेल . 
                       पेरावे तसे उगवते 
कर्मावर -कर्तृत्वावर असावा विश्वास ,नसावा कामात नुसता आभास ,
यशाची आसच माणसाचा करते विकास ,पेरून उगवले नाहीतर माणूस होतो निराश ,
प्रयत्न करत रहावे ,जोपर्यंत आहे श्वास ,कमी प्रयत्नात मिळते यश ,तेंव्हा संचिताचा वाटा असावा खास ,
श्रद्धा -भक्ती -आस्था असावी डोळस ,शुद्धी अन सहवासा साठी असावेत उपवास ,
पार्थाचा मार्गदर्शक झाला सारथी ,आपण त्याच्या तत्वज्ञाना वर चालूया ठेवूनि विश्वास .                              



सुविचार

                             सुविचार 
शिक्षणाच्या जोडीला हवेत संस्कार ,व्यापाराच्या जोडीला व्यवहार ,
कमवत्या कर्तुत्वाला काटकसरीच्या संसाराचा भक्कम आधार ,
सुखाच्या शेल्याला दुःखाची थोडी टोचणारी भरजरी किनार ,
जागतिकीकरणाची नौका ,माणुसकीच्या सागरातूनच तरणार ,
यशामधे थोडा नशिबाचा वाटा अन प्रयत्न मात्र लागतात अपार ,
कोणताही व्यवहार असावा स्वच्छ आणि आरपार ,देव तारतो त्याला कोण मारू शकणार ?
संकटाना समजावे संधी ,संधीचे करावे सोने ,बावन्नकशी चमकदार . 

काळ एक अतिथी


                                        काळ एक अतिथी 
दारी आलेला अतिथी जाणावा देवा समान ,दारी कोण ते पाहूनच द्यायचा असतो मान-सन्मान ,
चोर- भामटा -कामचुकार पारखूनच ,द्यावे सदपात्री दान ,राखावा लक्ष्मण -रेषेचा मान ,
चालावे -वागावे काळाबरोबर ,नाहीतर नाहक गमवावे लागतात प्राण ,
अनेक दुःखे विसरायला काळ हे एकच औषध अन प्रमाण ,
काल पासून घ्यावा धडा ,आज मधे जगण्या साठी ,उद्याची अती चिंता चिता समान ,
काळ एक अतिथी चार दिवस येतो -जातो ,त्याचा महिमा असे महान . 

सकारात्मकता एक रामबाण उपाय



    
     
    

सकारात्मकता एक रामबाण उपाय 
नुसती चिंता चिता समान ,संकट समयी सकारात्मकता एक रामबाण ऊपाय ,
एकाकीपणात एकांताचे सुख अनुभवावे ,संकटालाही संधी समजावे ,
दुःखा मुळे असते सुखाचे अस्तित्व ,अंधारामुळेच समजते प्रकाशाचे तत्व ,
सकारात्मकता करते परिसाचे काम ,मग लोखंडालाही लाभे खणखणीत दाम ,
अर्थ --प्राण्यात प्राणी मनुष्य प्राणी ,चांगल्या -वाईटातला फरक जाणी ,
घर बनते प्रेमाच्या माणसांनी ,नाही नुसत्या दगड मातीच्या भिंतींनी ,
दिवस बनतो प्रकाशाने ,नाही नुसती रात्र संपल्याने ,
जीवन बनते कर्तृत्वाने ,नाही नुसत्या शरीराच्या जन्माने ,
मरण खुलते जळून उरलेल्या चांगल्या आठवणींच्या भस्माने .